agriculture news in marathi Lucerne for green fodder | Agrowon

हिरव्या चाऱ्यासाठी लुसर्न

के.एल.जगताप, डॉ. अजय किनखेडकर
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

लुसर्न पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणीचे अंतर ३० सेंमी ठेवावे. हिरव्या चाऱ्यासाठी पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात.
 

लुसर्न पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणीचे अंतर ३० सेंमी ठेवावे. हिरव्या चाऱ्यासाठी पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात.

लुसर्न पिकापासून जनावरांना वर्षभर कोवळा, लुसलुशीत, हिरवा चारा मिळतो. हा चारा दिसावयास मेथीसारखा असल्यामुळे याला मेथी घास या नावाने ओळखले जाते. याची लागवड करताना बियाणे शुद्ध असावे. हा चारा अत्यंत पोषक असल्यामुळे जनावारांच्या दूध उत्पादनात वाढ होते.

 • शेळ्या हा चारा आवडीने खातात. हिरव्या चाऱ्यात २० टक्के कच्ची प्रथिने , ७२ टक्के पचनीय पदार्थ, २५ टक्के तंतुमय पदार्थ असतात. १.५ टक्के हे कॅल्शिअम, ०.२ टक्के फॉस्फरस आणि जीवनसत्त्व अ, ब, असते.
 • पाण्याचा व्यवस्थित निचरा असणारी जमीन असावी. कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, व कमी उष्ण वातावरण तसेच थंड हवामानही चांगले मानवते.
 • लागवडीपूर्वी २ ते ३ वेळा वखरणीकरून चांगल्या प्रकारचे वाफे तयार करावेत. वाफे हे समतल प्रमाणात असावेत.
 • हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी २५ किलो बियाणे लागते.
 • साधारणपणे पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणीचे अंतर ३० सेंमी ठेवावे. काही ठिकाणी याची पेरणी बियाणे फोकून करतात.
 • लागवडीसाठी आर.एल-८८, सिरसा-९, आनंद-२ या सुधारित जातींची लागवड करावी.
 • जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. प्रती हेक्टरी ५० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे.
 • पिकाची वरचेवर खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
 • पिकाला १५ ते २० दिवसांनी पहिले पाणी देणे गरजेचे आहे. त्यानंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
 • पिकाच्या पेरणीनंतर ३० दिवसांमध्ये तणाचे व्यवस्थापन करावे. याकरिता १ ते २ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
 • हिरव्या चाऱ्यासाठी पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात.
 • पूर्ण हंगामामध्ये हिरव्या चाऱ्याचे उत्पादनासाठी २.५ महिन्यांनी पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या १.५ महिन्यांनी कराव्यात. हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन हे १००० ते १२०० क्विंटल मिळते.

संपर्क ः के. एल.जगताप,९८८१५३४१४७
(कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि.बीड)


इतर चारा पिके
हिरव्या चाऱ्यासाठी लुसर्नलुसर्न पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
उत्तम प्रतिच्या हिरव्या चाऱ्यासाठी चवळी...चवळी पिकापासून उत्तम प्रतिचा हिरवा चारा मिळवता...
चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया...उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही...
चाऱ्यासाठी पर्यायी स्रोत - शेवगाशेवग्याच्या शेंगांचा समावेश मानवी आहारामध्ये...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
जनावरांसाठी चारा म्हणून विविध...झाडांचा हिरवा पाला तुलनात्मकदृष्ट्या एकदल चारा...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
सकस चाऱ्यासाठी लसूण घासलसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० सें.मी...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
कोकणातही मक्यावर स्पोडोप्टेरा...अमेरिकन लष्करी अळी (शा. नाव -स्पोडोप्टेरा...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
पौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघासलसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने,...
लागवड ओट चारापिकाची...संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा...