Agriculture news in marathi In Maan-Khatav taluka, there is no bill for fodder holder | Agrowon

माण- खटाव तालुक्‍यात बिलांअभावी छावणीचालकांची फरपट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 जुलै 2020

बिजवडी, जि.सातारा  : माण- खटाव तालुक्‍यात दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे जगण्यास मोठी मदत झाली. मात्र, वर्ष होऊनही शासनाने अद्याप बिले न दिल्याने छावणीचालक आता प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. 

बिजवडी, जि.सातारा  : माण- खटाव तालुक्‍यात दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे जगण्यास मोठी मदत झाली. मात्र, वर्ष होऊनही शासनाने अद्याप बिले न दिल्याने छावणीचालक आता प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. 

माण- खटाव तालुक्‍यांत दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१९ पासून चारा छावण्या सुरू होत्या. मात्र, शासनाने या चारा छावण्यांची माहे सप्टेंबर- ऑक्‍टोबर २०१९ ची बिले थकीत ठेवली. त्यामुळे छावणीचालक आर्थिक संकटात आले आहेत. ही थकित बिले त्वरित काढून छावणीचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत जगदाळे यांनी निवेदनाद्वारे केली. 

माण- खटाव तालुक्‍यात माहे एप्रिल ते ऑक्‍टोबर २०१९ या कालावधीत चारा छावण्या सुरू होत्या. दुष्काळी स्थितीत त्यामुळे जनावरांचे पालनपोषण झाले. सुरुवातील शासनाकडून छावण्याची बिले काढण्यास विलंब झाल्याने छावणीचालक अगोदरच कर्जबाजारी झाले होते. त्यानंतर शासनाने एप्रिल ते ऑगस्ट २०१९ महिन्यांची बिले चालकांना टप्प्याटप्प्याने दिली आहेत. मात्र, सप्टेंबर - ऑक्‍टोबर महिन्यातील बिले थकविली आहेत.

 अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन

आता या थकलेल्या बिलांप्रश्‍नी छावणीचालकांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना छावण्यांचे बिल मिळावे, या मागणीचे निवेदन दिले. त्यांनीही तत्काळ या निवेदनाची दखल घेत शासन, प्रशासनाशी संपर्क करून लवकर अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही जगदाळे यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...