दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
टेक्नोवन
आंबा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे
अलीकडे कोकणाबरोबर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये केशरसह अन्य जातींची लागवड वाढत आहे. आंबा फळे व त्यापासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थाना वर्षभर देशपरदेशात भरपूर मागणी आहे. आंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो.
अलीकडे कोकणाबरोबर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये केशरसह अन्य जातींची लागवड वाढत आहे. आंबा फळे व त्यापासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थाना वर्षभर देशपरदेशात भरपूर मागणी आहे. आंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो.
महाराष्ट्रातील कोंकण विभागात हापूस आंबा हे पारंपरिक फळपीक आहे. आंब्याच्या विशिष्ठ स्वाद, रंग, चव व टिकाऊपणा याबरोबरच प्रक्रियेमध्ये टिकून राहणारा स्वाद यामुळे हापूस या जातीस देशांतर्गत व निर्यातीसाठी मोठी मागणी आहे. आंब्याची वाहतूक करताना, आंबा तोडताना, साठवणूक करताना आंब्याचे बरेच नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आंब्याचा गर काढून त्याला कॅनिंग व पॅकेजिंग करता येते. या गराला बाजारात खूप मागणी असते. वेगवेगळ्या मिठाई उद्योगामध्ये, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ उद्योगामध्ये, बेकरी व चॉकलेट उद्योगामध्ये, औषध उद्योगामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. रसवंती गृह, आइस्क्रीम सेंटर या ठिकाणी नैसर्गिक स्वादासाठी आंबा गर वापरला जातो.
फळे धुणारे यंत्र
- आंबा तोडणी किंवा साठवणीनंतर प्रक्रिया करण्यापूर्वी फळे स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. या यंत्रांमध्ये आंबे टाकून आंब्यावरून नोझलच्या साह्याने पाण्याची फवारणी केली जाते. त्यामुळे फळावरील धूळ, डाग, रासायनिक अवशेष इ. स्वच्छ केले जातात.
- हे यंत्र संपूर्णपणे स्टेनलेस स्टिलचे असून, यंत्राची क्षमता ही १०० किलो प्रति तास इतकी आहे. या यंत्राला २४० व्होल्ट विजेची आवश्यकता असून, त्याला १ एचपी विद्यूत मोटार जोडलेली असते. यंत्राचा आकार हा ५ फूट बाय २ फूट एवढा असतो. यंत्राचे वजन हे ९०-११० किलो असून यंत्रांमध्ये ३०० लीटर पाणी साठवता येते.
- या यंत्राला चाके असल्याने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहजतेने नेता येते. धुतलेले व स्वच्छ झालेले आंबे कटींग टेबलापर्यंत पोचवता येतात. या यंत्रांची किंमत ९० हजारापासून सुरु होतात. या यंत्राचा वापर अन्य फळांच्या स्वच्छतेसाठीही होऊ शकतो.
कटिंग टेबल
या टेबलवर मजुराच्या साह्याने चाकूने आंबा कापला जातो. साल व कोय वेगळी करून तुकडे केले जातात. स्टेनलेस स्टिलपासून बनवलेल्या टेबलची लांबी ५ फूट व उंची ३ ते ४ फूट असते. तसेच वरील बाजूला फूड ग्रेड स्टीलचे कोटींग असते. या टेबलवर एका वेळेला ४ कामगार काम करू शकतात. या टेबलची किंमत २५ हजार रूपये आहे.
फळातून घट्ट रस काढण्याचे यंत्र (पल्पर)
- या यंत्राचा उपयोग आंब्याचा घट्ट रस काढण्यासाटी केला जातो. तुकडे केलेला आंबा या यंत्रामध्ये टाकला जातो. त्यानंतर यंत्रामध्ये असणाऱ्या विशिष्ट भागावरून फिरणाऱ्या पॅडलद्वारे विभाजन केले जाते. त्यातून आपल्याला आवश्यक द्रव्य आणि इच्छित पदार्थाचे प्रमाण यानुसार जाळी लावलेली असते. त्यातून रस निघाल्यानंतर उर्वरित चोथा मोठ्या नॉन-प्लगिंग पोर्टद्वारे बाहेर टाकला जातो. आंब्याचा रस हा कंटेनरमध्ये खालील बाजूला साठवला जातो.
- आंबा गर काढण्याची विविध क्षमतेची यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचे बनवलेल्या या यंत्राचे वजन ७० किलो आहे. यंत्राला ०.५ एच. पी ची विद्यूत मोटार जोडलेली असते. या यंत्रामध्ये प्रति तास ५० किलो रस तयार होतो. यंत्राला थ्रीफेज व २२० व्होल्ट ऊर्जा लागते. हे यंत्र अर्धस्वयंचलित व हाताळायला सोपे आहे. या यंत्रांची किंमत ही ६० हजारापासून सुरु होते.
संपर्क - सचिन शेळके, ८८८८९९२५२२
सचिन मस्के, ९०४९९६७२५७
(पीएच. डी. विद्यार्थी, अन्नविज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सॅम हिंगिनबॉटम कृषी, प्राद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश.)
- 1 of 21
- ››