फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रे

oil separator and masala coating machine
oil separator and masala coating machine

तळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स किंवा कुरकुरीत खाद्यपदार्थांना अधिक मागणी आहे. विविध धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांना वेगवेगळ्या नळ्या, चौकोनी काप, प्राण्यांचे आकार, एबीसीडी असे आकार देणे शक्य आहे. परिणामी, चटकदार स्वादाबरोबर आकारही लहान मुलांना आकर्षित करतात. ऑइल फ्रायर मशिन 

  • या यंत्राद्वारे कच्चे फ्राइम्स तळता येतात. आपल्या उद्योगाच्या आकारानुसार वेगवेगळ्या क्षमतेची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत.  
  • तळण्यासाठी आवश्यक असणारे तापमान नियंत्रित करणे शक्य असून, त्यासाठी खास नियंत्रक असतात. त्याचप्रमाणे थर्मोकपलही उपलब्ध असतात. परिणामी, तेल किंवा पदार्थ जळण्याचे प्रकार यात टाळले जातात.
  • ड्रायर किंवा ऑइल सेपरेटर मशिन 

  • या यंत्रामध्ये जाळीदार भांड्यामध्ये तळलेले फ्राइम्स ठेवून २००० ते ३००० फेरे प्रतिमिनिट या वेगाने फिरवले जातात.  
  • फ्राइम तळल्यानंतर त्यातील अतिरिक्त तेल या यंत्राद्वारे वेगळे काढले जाते.
  • मसाला कोटिंग मशिन 

  • तळलेल्या फ्राइम्सवर योग्य त्या मसाल्याचे आवरण दिले जाते. त्यासाठी इम्पेलर, रिबन अथवा सिलेंडर टाईप या तीन प्रकारांमध्ये मसाला कोटिंग यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत.
  • पाउच पॅकिंग मशिन 

  • उद्योगाच्या क्षमतेनुसार सिंगल किंवा थ्री फेजवर चालणाऱ्या पाउच मशिन उपलब्ध आहेत. यामध्ये केवळ योग्य त्या मायक्रॉन जाडींचे आपल्या कंपनीचे व ब्रँडचे नाव प्रिंट करून घेतलेले लॅमिनेटेड कागद गुंडाळी स्वरूपामध्ये जोडावे लागतात.  
  • या यंत्रामध्ये त्या कागदापासून पॅकेट तयार होणे, उष्णतेद्वारे चिकटणे, त्यात नियंत्रकाद्वारे योग्य त्या वजनाचे पदार्थ येऊन पडणे आणि वरून पॅक करणे, अशी सर्व कामे होतात.  
  • हे यंत्र संपूर्णत: प्रोग्राम लॉजिकल कंट्रोल (संगणकीय आज्ञावलीनुसार स्वयंचलित) पद्धतीने काम करते. त्यामध्ये बॅच कोडिंग, डेट प्रिंटिंगसह ताशी ४०० ते ३००० पॅकेट तयार करणे शक्य आहे.  
  • दोन एचपी पॉवर सिंगल फेज, डबल सिलिंडर कॉम्प्रेसर हा पाउच पॅकिंग मशिन ऑपरेटिंग करण्यासाठी आवश्यक असतो. 
  • नायट्रोजन सिलिंडर

  • नायट्रोजन हा उदासीन वायू असून, त्यामुळे अन्नपदार्थ अधिक काळ टिकून राहतो.|  
  • पाऊस किंवा पॅकेट तयार करतेवेळी त्यातील अन्य वायू काढून टाकून त्या जागी नायट्रोजन वायू भरणे आवश्यक असते. यासाठी पाउच पॅकिंगसोबत नायट्रोजन गॅस सिलिंडर व रेग्युलेटर असणे आवश्यक आहे. 
  • अन्य साहित्य

  • प्रक्रिया उद्योगामध्ये पदार्थ ठेवण्यासाठी संपूर्ण स्टेनलेस स्टीलचे ट्रे, लोखंडी मचाण, झारे, पातेले, फायबर पाट्या, चमचे इत्यादी साहित्य आवश्यक असते.  
  • संपर्कः वीरेंद्र फोके, ९१५८६१३५३५ (वीरेंद्र फोके हे अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, वाघोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे सहायक प्राध्यापक असून, विनायक फोके यांचा गुळपोळी, ता. बार्शी येथे खासगी प्रक्रिया उद्योग आहे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com