मदनी गावाचा होणार विकास

खासदार पी. चिदंबरम यांनी दत्तक घेतलेल्या मदनी गावाची नुकतीच पाहणी केली.
खासदार पी. चिदंबरम यांनी दत्तक घेतलेल्या मदनी गावाची नुकतीच पाहणी केली.

वर्धा : माजी अर्थमंत्री व विद्यमान खासदार पी. चिदंबरम यांनी दत्तक घेतलेल्या वर्धा जिल्ह्यातील मदनी गावाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या गावात विविध विकासकामांना सुरवात होणार असून, त्याचा आढावा पी. चिदंबरम यांनी नुकताच घेतला.

आमदार रणजित कांबळे यांच्या विनंतीवरून पी. चिदंबरम यांनी मदनी गावाची निवड खासदार दत्तक ग्रामअंतर्गत केली होती. या गावाला खासदार पी. चिदंबरम यांनी शनिवारी (ता. २५) भेट दिली. मदनी ग्रामपंचायतमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी त्यांनी गावातील नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या.

या गावांमध्ये राष्ट्रीयीकृत बॅंक शाखा, क्रीडांगण, वाचनालय, सांस्कृतिक भवन, गावातील पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा या सगळ्या कामाकरिता लागणाऱ्या जागेची पाहणी त्यांच्याद्वारे करण्यात आली.

आमदार कांबळे यांच्याशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने ही विकासकामे करणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. गावाच्या विकासाकरिता जिल्हाधिकारी यांच्या कक्षात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करून कामाला गती देण्याच्या सूचनाही श्री. चिदंबरम यांनी केल्या. या वेळी कॉँग्रेस अध्यक्ष सुनील कोल्हे, जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला देशमुख, मदनी सरंपच दीपक कोल्हे, पांडुरंग देशमुख, मनोहर खडसे, विजय जयस्वाल, ज्ञानेश्‍वर ढगे, संजय शिंदे अादी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com