माढा, केमला एमआयडीसीसाठी जमिनीचे सर्वेक्षण करा : उद्योगमंत्री तटकरे

माढा, केमला एमआयडीसीसाठी जमिनीचे सर्वेक्षण करा : उद्योगमंत्री  तटकरे
माढा, केमला एमआयडीसीसाठी जमिनीचे सर्वेक्षण करा : उद्योगमंत्री तटकरे

सोलापूर : करमाळा व माढा मतदारसंघातील एमआयडीसीबाबत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची मुंबईत उद्योगमंत्री आदिती तटकरे यांच्या दालनामध्ये बैठक झाली. त्यात माढा व केम येथील एमआयडीसीबाबत जमीन सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे व संजय शिंदे यांनी दिली.  बैठकीत करमाळा एमआयडीसीमध्ये दर जास्त असल्यामुळे उद्योग कमी येत असून, त्याबाबत ज्या उद्योगांना सवलती देता येतात अशा उद्योगाची मागणी आली तर सवलत देण्यात येईल. याबाबत एमआयडीसीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. करमाळा तालुक्‍यातील केम व माढा तालुक्‍यातील माढा येथील नवीन एमआयडीसीसाठी सर्वेक्षण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. माढ्यात खासगी व शासकीय जमिनीचेही सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. माढा तालुक्‍यातील मोडनिंब येथील एमआयडीसीसाठी आतापर्यंत मिळालेल्या जमिनीशिवाय उर्वरित जमीन संपादनासाठी लोकांबरोबर लोकप्रतिनिधी व एमआयडीसीचे अधिकारी पाहणी करून बैठका घेतील व जमीन संपादनासाठी प्रयत्न करतील, असे निर्णय घेण्यात आले.  माढ्यातील एमआयडीसीबाबत अनेक वर्षांपासून मागणी होती. अलीकडच्या काळात याबाबत आंदोलनेही करण्यात आली होती. सर्वेक्षणाच्या निर्णयामुळे माढ्यात एमआयडीसी होण्याबाबत प्राथमिक हालचालींना सुरुवात झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com