agriculture news in Marathi, Madhavan Rajiwan says, heavy rain in next week, Maharashtra | Agrowon

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोरः माधवन राजीवन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 जून 2019

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (१ ते ६ जुलै) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी बुधवारी (ता. २६) ट्विटद्वारे दिली. 

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (१ ते ६ जुलै) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी बुधवारी (ता. २६) ट्विटद्वारे दिली. 

दरम्यान, आज (ता. २७) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. केरळमध्ये आठ दिवस उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवासही अडखळत झाला. महाराष्ट्रात १९७२ नंतर उशिराने २० जून रोजी मॉन्सून पोचला. मॉन्सूनने सर्व राज्य व्यापल्यानंतर मात्र पावसाने अनेक भागात उघडीप दिली आहे. मॉन्सूनने मंगळवारी संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर बुधवारी (ता. २६) कोणतीही प्रगती केली नाही. वायव्य, तसेच उत्तर भारतातील राज्यांमध्ये १ ते ३ जुलैपर्यंत मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. यातच हवामान विभागाने ३० जून रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत दिले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर मॉन्सून जुलै महिन्यात सक्रिय होण्याचा अंदाज राजीवन यांनी वर्तविला आहे. भारतीय हवामान खाते केंद्रातील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याच मंत्रालयाचे सचिव असलेल्या राजीवन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, यंदा देशात मॉन्सून उशिरा दाखल झाला. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून मॉन्सूनची सातत्याने प्रगती होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या पोषक वातारणामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मॉन्सून सक्रिय होईल. त्यामुळे महाराष्ट्रसह ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणि गुजरात या भागात १ ते ६ जुलै दरम्यान जोरदार पाऊस पडेल. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळल्या.
 
बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)  
  
कोकण : धसई २९, सौंदळ ५५, जैतापूर २८, पुनस ७३, पाटगाव २८, मालवण ७७, पेंडूर ४८, मसुरे २६, आचरा २६, आंबेरी ४५, पोईप ३५, म्हापण ४७, तळेरे ३६, वैभववाडी ४६, येडगाव ४५, चिंचणी ३२, तारापूर ७७. मध्य महाराष्ट्र : पिंपळगाव २५, वावी २२, शेंदुर्णी ४१, पहूर २४, पाचोरा ४६, नांद्रा २८, वरखेडी ३४, पारनेर ४०, देवळाली २३, ब्राह्मणी ४०.८, वेळू २५, संगमनेर २४, बेल्हा ३३, आंबेगाव ६७, न्हावरा ३१, मलठण २१, कोरेगाव ४७, शिरूर ५९, बावडा २७, जेजूरी २१, दुधनी ३३, रोपळे २५, हातीद ५५, कोळा ३८, कोळे ६०, कुक्‍कुडवाड २५, कबनूर २७, गगनबावडा ३६, साळवण २३. मराठवाडा : खंडाळा ३६, लाडगाव २६, जामखेड ४३, उमापूर २३, दिदरूड २४, घाटनांदूर २२, नांदूरघाट २०, धारूर २७, गातेगाव २०, चिंचोली ३२, उस्मानाबाद शहर २४, परांडा २८, पिंगळी ३२. विदर्भ : पातुर्डा २१, कवठळ ३८, वरवंड २२, लोणी ४७, हिवखेड २५, अटाळी ४२, अडगाव २१, वझर २७,  राजगाव २६, केनवड ४९, करंजी २३, चांडस ३१, हिवरा २४, भातकुली २६, पूर्णानगर २६, आष्टी २२, निंभा २३, असरा २०, खाल्लार २३, असेगाव २६, तळेगाव ४९.

इतर अॅग्रो विशेष
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...
कोकण, घाटमाथ्यावर आज सरींची शक्यतापुणे: मॉन्सून काहीसा कमजोर झाल्याने राज्याच्या...
‘झिरो बजेट' शेतीवर विद्यापीठे करणार...पुणे : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेल्या...
देशात खरीप पेरा ४१३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली: राजस्थान, पंजाब आणि हरियाना...
पावसाळ्यातही दुष्काळाचे चटके कायम...नाशिक: मागील वर्षी शेतकऱ्यांना गंभीर दुष्काळाचा...
राज्यात पेरा आणि विमा संरक्षित...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेतील विमा संरक्षित...
राज्यात शुक्रवारनंतर पुन्हा चांगला...पुणे : मॉन्सून हंगामात एका टप्प्यात चांगल्या...