Agriculture news in Marathi Madhya Pradesh government restricts sale of seeds | Agrowon

मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर निर्बंध

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 एप्रिल 2021

इंदूरमधून परराज्यात बियाणे विक्रीस मध्य प्रदेश सरकारने मनाई केली आहे. सोयाबीन बियाण्यांच्या टंचाईच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बियाणे टंचाईचे सावट आणखी गडद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा प्रांत असलेल्या इंदूरमधून परराज्यात बियाणे विक्रीस मध्य प्रदेश सरकारने मनाई केली आहे. सोयाबीन बियाण्यांच्या टंचाईच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बियाणे टंचाईचे सावट आणखी गडद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मध्य प्रदेशातील बियाणे उद्योगावर किसान कल्याण तथा कृषी विकास संचालनालयाचे नियंत्रण आहे. इंदोर जिल्हा किसान कल्याण विभागाच्या उपसंचालकांनी २० एप्रिल रोजी जारी केलेल्या एका आदेशानुसार (२०२१-२५३४) बियाण्याची विक्री आता संबंधित कंपन्यांना मनमानी पद्धतीने करता येणार नाही.  

प्रमाणित, सत्यप्रत किंवा संशोधित केलेले कोणतेही बियाणे जिल्हा किंवा राज्याच्या बाहेर आमच्या मान्यतेशिवाय विकता येणार नाही, असे मध्यप्रदेश कृषी विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘‘खरीप हंगामासाठी बियाण्याच्या मागणीच्या तुलनेत बिजोत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे आम्ही विक्रीवर निर्बंधांबाबत आदेश जारी करीत आहेत. बियाणे कंपन्यांनी या आदेशाचे उल्लंघन करू नये; अन्यथा बियाणे कायदा १९६६ प्रमाणे कंपन्यांवर कारवाई केली जाईल,’’ असा इशारा तेथील कृषी विभागाने दिला आहे.

मध्य प्रदेशातील बियाणे उद्योग या नव्या निर्बंधांमुळे हादरला आहे. तेथील कंपन्या अब्जावधी रुपयांचे बियाणे परराज्यात विकतात. त्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील बियाणे कंपन्या तसेच विक्रेत्यांशी करार करतात. या करारापोटी कोट्यवधी रुपयांच्या आगाऊ रकमा या कंपन्यांकडून गोळा केल्या जातात. अशा स्थितीत परराज्यात बियाण्यांची डिलिव्हरी न केल्यास मध्यप्रदेशातील स्थानिक बियाणे कंपन्या कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

‘‘महाराष्ट्राच्या कृषी विभागाने मध्यप्रदेशातील बियाणे कंपन्यांचा अकारण छळ केला आहे. त्यामुळे देखील यंदा अनेक कंपन्या कमी माल पुरवणार होत्या. महाराष्ट्र सरकारने ‘इन्स्पेक्टर राज’ला आवर घालावा; अन्यथा बियाणे टंचाई जास्त तीव्र होईल व त्याची जबर किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागेल,’’ अशी भीती मध्यप्रदेशातील बियाणे उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेशात यंदा सोयाबीनचे कमी बीजोत्पादन झाले आहे. त्यामुळे टंचाई राहील ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यामुळे कृषी खात्याने परराज्यात बियाणे विक्रीवर लावलेले निर्बंध चुकीचे आहेत. ते हटविण्यासाठी आम्ही राज्याच्या कृषिमंत्र्याकडे दाद मागणार आहोत.
– मनिष काबरा, सचिव, सीडस् असोसिएशन ऑफ मध्यप्रदेश

निर्णयाचा महाराष्ट्राला फटका...

  • विक्रीवर निर्बंध चालू ठेवल्यास महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
  • इंदूर भागातून किमान ८ लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा
  • यंदा पुरवठ्यात २० ते ३० टक्के घट होण्याची शक्यता
  • शेतकऱ्यापुढे बियाणे मिळवण्यासाठी वाट खडतर

इतर ताज्या घडामोडी
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...