agriculture news in Marathi, Madhya Pradesh govt plans to do away with Bhavantar Bhugtan Yojana, Maharashtra | Agrowon

मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणार

कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असताना महत्त्वाकांक्षी भावांतर योजना सुरू केली होती. ही योजना शेतकऱ्यांना लाभ देण्यात अपयशी झाल्याचे येथील कॉंग्रेस सरकारचे म्हणणे आहे. गेल्या खरिपात सोयाबीन, मका आणि आले पिकाला भावांतर योजनेंतर्गत दर संरक्षण देण्यात आले होते, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असताना महत्त्वाकांक्षी भावांतर योजना सुरू केली होती. ही योजना शेतकऱ्यांना लाभ देण्यात अपयशी झाल्याचे येथील कॉंग्रेस सरकारचे म्हणणे आहे. गेल्या खरिपात सोयाबीन, मका आणि आले पिकाला भावांतर योजनेंतर्गत दर संरक्षण देण्यात आले होते, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली. 

मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना किमान रास्त दर मिळावा, यासाठी भावांतर योजना सुरू केली होती. या योजनेत सरकार शेतकऱ्यांना ‘मोडल’ दर आणि हमीभाव यांच्यातील फरकाची रक्कम देत होते. योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होता. ‘‘मागील वर्षी खरिपातील केवळ सोयाबीन, मका आणि आले पिकांचाच समावेश  यो योजनेत करण्यात आला होता.

बाजारात व्यापारी आणि शेतकरी संगनमत करून शेतीमालाचे दर कमी पातळीवर ठरवत असल्यामुळे योजनेत गैरव्यवहार होत होता. त्यामुळे यंदा सरकारने ही योजना बंद करण्याचा विचार केला आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. २०१८-१९ मध्ये मध्य प्रदेश सरकारने योजनेत फलोत्पादन पिकांसाठी एक हजार २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. भाजप सत्तेत असताना सरकारने २०१७-१८ मध्ये खरिपातील महत्त्वाच्या पिकांचा समावेश भावांतर योजनेत केला होता.

त्यानंतर योजनेत केवळ तीन पिकांचाच समावेश केला होता. त्यामुळे या योजनेचे महत्त्‍व दिसून आले होते. 

संगनमताने दर पाडण्याचे प्रकार
हंगामात बाजारात शेतीमालाची उच्च आवक झाल्यानंतर दर कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजप सत्तेत असताना भावांतर योजना सुरू करण्यात आली. तसेच, बाजारात काही व्यापारी शेतकऱ्यांना शेतीमाल कमी दरात विक्री करण्यासाठी संगनमत करून कमी दर ठरवितात. शेतकऱ्यांना सरकारकडून दरातील फरक मिळतो. मात्र बाजारात दर कृत्रिमरीत्या दबावात येतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

योजनेचे उद्दिष्ट बदलेले होते
भावांतर योजनेत शेतकऱ्यांना हमीभावातील फरक देण्याची तरतूद 
होती. मग दर हमीभावापेक्षा कमी असो किंवा जास्त. परंतु, २०१८-१९ मध्ये योजनेतून शेतकऱ्यांसाठी ‘फ्लॅट भावांतर योजना’ राबविण्यात येत होती. या योजनेत दर हमीभावापेक्षा जास्त असो किंवा कमी, समान रक्कम देण्यात येत होती. त्यामुळे सरकारने आधीच या योजनेचे उद्दिष्टच बदलले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...