मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये दर

मध्य प्रदेश बाजारात  कापसाला ५४०० रुपये दर
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये दर

जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेली कापूस खरेदी विविध खेड्यांवर जेमतेम अशीच सुरू आहे. यातच ओल्या मालाच्या नावाने कापसाची अनेक भागात ३१०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे खरेदी होत आहे. दुसरीकडे खेतिया (जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथील बाजारात मागील आठवड्यात चांगल्या कापसाला ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर लिलावात मिळाला.  खेतिया बाजारपेठेत दर वधारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम चोपडा, शिरपूर (जि. धुळे), यावल, जळगाव, धरणगावपर्यंत पोचतो. चोपडा तालुक्‍यात सध्या खेडा खरेदीत (थेट गावात जाऊन खरेदी) ३१०० ते ४५०० रुपये दराने कापसाची खरेदी होत आहे. कोरड्या मालाचे दर अनेक भागात सुधारले असून धरणगाव, जळगाव, बोदवड, जामनेर भागातील जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू झाले आहेत. कापसाचे दर किमान ५००० ते ५२०० रुपये जागेवरच किंवा खेडा खरेदीत मिळावेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण आता दर्जेदार, कोरडा कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com