मध्य प्रदेशात कापसाला ५५०० रुपये दर

मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील खेतिया बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) दर्जेदार किंवा उत्तम प्रकारच्या आठ क्विंटल कापसाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.
In Madhya Pradesh, the price of cotton is Rs 5500
In Madhya Pradesh, the price of cotton is Rs 5500

जळगाव ः मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील खेतिया बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) दर्जेदार किंवा उत्तम प्रकारच्या आठ क्विंटल कापसाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.

बडवानी किंवा खेतीया भाग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यालगत आहे. खेतीया बाजार समिती शहादा तालुक्यातील खेडदिगर, ब्राह्मणपुरी, सुलतानपूर आदी गावांपासून अगदी नजीक आहे. खेतीया बाजार समितीत खानदेशातील अनेक शेतकरी कापसासह कांदा विक्रीसाठी जातात. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातही शासकीय कापूस खरेदीसाठी कापूस महामंडळाचे केंद्र नसते. मंदीच्या वेळेस अनेक शेतकरी खेतिया बाजार समितीत कापसाची विक्री करतात.

सध्या खानदेशात कापसाची खेडा खरेदी रखडत सुरू आहे. पावसात भिजलेल्या व नंतर कोरड्या वातावरणात वेचलेल्या चांगल्या कापसाला सरसकट ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलला दर खेडा खरेदीत मिळत आहे. अशात खेतीया येथील बाजार समितीत कापसाला या हंगामात विक्रमी ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मंगळवारी मिळाला. या बाजार समितीत सध्या कापसाची आवक कमी आहे. आवक अलीकडेच रखडत सुरू झाली आहे.

दीपक सोनजी माळी (रा. खेतीया) यांच्या आठ क्विंटल कापसाला हा ५५०० रुपये प्रतिक्विंटलला दर खेतिया येथे मिळाला, अशी माहिती मिळाली. खेतिया बाजार समितीत गेल्या आठवड्यात प्रतिदिन ६५ क्विंटल कापसाची आवक झाली. कमी दर्जाच्या कापसाला या बाजार समितीत चार हजार ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक दर मिळत आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com