Agriculture news in marathi, Madhya Pradesh rains likely to improve | Agrowon

मध्यप्रदेशातील पावसाने सोयाबीन दरांत सुधारणेची शक्यता

विनोद इंगोले
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे या हंगामात सोयाबीन दरात सुधारणेची शक्‍यता वर्तविली जात आहे. सोयाबीन दर चार हजारांचा टप्पा पार करतील, अशी अपेक्षा आहे. सध्या कळमणा बाजार समितीत ३६०० ते ३८६४ रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. बाजारातील जुन्या सोयाबीनची आवक १५० क्‍विंटलवर पोचली आहे. 

नागपूर : मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे या हंगामात सोयाबीन दरात सुधारणेची शक्‍यता वर्तविली जात आहे. सोयाबीन दर चार हजारांचा टप्पा पार करतील, अशी अपेक्षा आहे. सध्या कळमणा बाजार समितीत ३६०० ते ३८६४ रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. बाजारातील जुन्या सोयाबीनची आवक १५० क्‍विंटलवर पोचली आहे. 

मध्यप्रदेश सोयाबीनचे हब म्हणून ओळखले जाते. परंतु, यावर्षी संततधार व अतिवृष्टीच्या पावसाचा फटका या भागातील सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. तेथील उत्पादकता घटल्याने इतर राज्यांत सोयाबीन दरात तेजीची शक्‍यता वर्तविली जात आहे. बाजार समितीत नव्या सोयाबीनची सध्या आवक झालेली नाही. जुन्या सोयाबीनची देखील अवघी १५० क्‍विंटलची आवक आहे. ३६०० ते ३८६४ रुपये दराने याचे व्यवहार होत आहेत. 

बाजारात सरबती गव्हाचे दर २५०० ते २७०० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत. गव्हाची रोजची सरासरी आवक २०० क्‍विंटलची आहे. हरभरा आवक ४५० क्‍विंटलची असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. हरभऱ्याला ३६५० ते ४२११ रुपये क्‍विंटलचा दर मिळाला आहे. तुरीची आवकदेखील केवळ ५० क्‍विंटलची असून ४९२१ ते ५३४१ रुपयाने तुरीचे व्यवहार होत आहेत. संत्र्याची आवक १३ क्‍विंटलची, तर दर २००० ते ३००० रुपये क्‍विंटलचे होते. मोठ्या आकाराच्या मोसंबीची ६०० क्‍विंटलची आवक, तर दर ३८०० ते ४५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. 

बाजारातील केळीची आवक ६२ क्‍विंटलवर पोचली आहे. ४५० ते ५५० रुपये क्‍विंटलवर केळीचे दर स्थिर आहेत. डाळिंबाचे दर २००० ते ७००० रुपये क्‍विंटलचे असून आवक १००५ क्‍विंटलवर पोचली आहे. बाजारात बटाट्याची लगतच्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा भागातून आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. त्यांची आवक ४५७० क्‍विंटलची असून ८०० ते १३०० रुपयांवर दर स्थिर आहेत. लाल कांद्याची आवक १००० क्‍विंटल, तर दर २००० ते ३३०० रुपये क्‍विंटलचे आहेत. पांढरा कांदा आवक १६६९ क्‍विंटलची, तर दर ३००० ते ४२०० रुपये क्‍विंटलचे होते. 

लसून दरातही तेजी आली असून ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलने त्याचेच व्यवहार होत आहेत. आवक ३५६ क्‍विंटलची आहे. वाळलेल्या मिरचीचे दरही तेजीत आहेत. ७००० ते १०००० रुपयाने वाळलेल्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. आवक २५१ क्‍विंटलची आहे. टोमॅटो दर ८०० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिर, तर आवक १४० क्‍विंटलची आहे. भेंडीची आवक १५० क्‍विंटलची, तर दर १५०० ते २००० रुपयांचे आहेत. गवार शेंगा १५०० ते २००० रुपये  क्‍विंटल आणि आवक १४५ क्‍विंटलची होती. 

हिरव्या मिरचीला १४०० ते १८०० रुपये क्‍विंटलचा दर आणि आवक १३० क्‍विंटलची होती. कारली २२०० ते २६०० रुपये क्‍विंटल आणि आवक १४२ क्‍विंटलची असल्याचे सांगण्यात आले. कोबीची १५० क्‍विंटलची आवक आणि दर १००० ते १५०० रुपये क्‍विंटल होते. पालकाचे दर २८०० ते ३००० रुपये क्‍विंटल आणि आवक ७० क्‍विंटलची होती. लिंबांचे दर ५००० ते ६००० रुपये क्‍विंटल आणि आवक ९० क्‍विंटलची होती.


इतर बाजारभाव बातम्या
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...