कुलगुरू चषक स्पर्धेत ‘माफसू’ची बाजी

कुलगुरू चषक स्पर्धेत ‘माफसू’ची बाजी
कुलगुरू चषक स्पर्धेत ‘माफसू’ची बाजी

नागपूर ः अमरावती विद्यापीठात आयोजित कुलगुरू चषक आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रिकेट स्पर्धेत माफसूने उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेत राज्यातील सोळा विद्यापीठाचे कर्मचारी सहभागी झाले होते. 

बाद फेरीत खेळलेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचा सलग पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत ‘माफसू’च्या संघाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात कृषी विद्यापीठ संघ विजय होऊन ‘माफसू’च्या संघाला उपविजेतेपद मिळाले. कुलगुरू चषक स्पर्धेत दुसऱ्यांदाच सहभागी झालेल्या माफसूच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले हे येथे उल्लेखनीय आहे. 

दैनंदिन व्यस्त कामाशिवाय क्रिकेटमध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल माफसू कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. संघाच्या यशात डॉ. अजय गावंडे, डॉ. अतुल ढोक, डॉ. राजेश लिमसे, डॉ. मिलिंद हाडगे, डॉ.  काका कोसे, सागर जोशी, विकास तिरपुडे, डॉ. अजित माळी, व्यवस्थापक दिलीप रघुवंशी, प्रशिक्षक डॉ. जयंत कोरडे यांचा वाटा होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com