‘माफसू’तील प्राध्यापक करणार काळ्या फिती लावून कामकाज

सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक ही कालबद्ध पदोन्नती आणि ‘एपीआय’ त्वरित लागू व्हावा यासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे.
MAFSU employee
MAFSU employee

उदगीर, जि. लातूर: येथील पशुवैद्यक, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील तीनही महाविद्यालयांच्या प्राध्यापक संगठनेने सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक ही कालबद्ध पदोन्नती आणि ‘एपीआय’ त्वरित लागू व्हावा यासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी २ डिसेंबरपर्यंत सर्व प्राध्यापक व समकक्ष पदावरील  कर्मचारी काळा फिती लावून आंदोलन करणार आहेत. आपल्या मागणीवर कार्यवाही न झाल्यास ३ डिसेंबर रोजी विद्यापीठ वर्धापनदिनी बहिष्कार टाकण्याचा इशारा प्राध्यापकांच्या संघटनांनी दिला आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त उदगीर येथील तीन महाविद्यालये, पशुपैदास प्रक्षेत्र आणि उपकेंद्र मिळून मोठा कॅम्पस आहे. येथील प्राध्यापक वर्गाचे अनेक प्रश्न पुढे आले आहेत. अनेक वर्षांपासून प्राध्यापकांच्या पदोन्नतीबाबत विद्यापीठाचे धोरणच नसल्याने प्राध्यापक वर्गात खदखद निर्माण झाली आहे.  उदगीर येथील कॅम्पस हा विद्यापीठात सर्वांत मोठा असला, तरी अतिशय तुटपुंज्या मनुष्यबळावर शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याचा गाडा हाकण्याचा प्रयत्न येथील प्राध्यापक वर्ग स्थापनेपासून करीत आहेत. येथील प्राध्यापक वर्गाचे अनेक प्रश्न आहेत. विद्यापीठ प्रशासन या प्रश्नाकडे सोईस्करपणे डोळेझाक करीत असल्याचा प्राध्यापक वर्गाचा आक्षेप आहे. कालबद्ध पदोन्नती सोबतच एपीआय, सातवा वेतन आयोग, सहाव्या वेतन आयोगाचा वेतनवाढीचा फरक, उच्च शिक्षणाचे दोन वेतन अंशदान, बदली धोरण अशा प्रश्नांमुळे प्राध्यापक चिंतित आहेत.  आजपर्यंत अनेक वर्षांपासून रखडलेले विविध प्रश्न विद्यापीठ पातळीवर सोडवले नसल्याचे प्राध्यापक संघटनेचे म्हणणे आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी प्राध्यापक आजपर्यंतचे सौम्यरूप कामी येणार नसल्याचीही खंत प्राध्यापक वर्गाच्या संघटनेकडून व्यक्त होत आहे. प्राध्यापक वर्गाच्या रास्त मागण्यांप्रती प्रशासनाकडून त्वरित कार्यवाही अपेक्षित आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com