agriculture news in Marathi magel tyala gotha from MANREGA Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर गोठे’ ही योजना

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जनावरांचे गोठे बांधता येणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘हर घर गोठे- घरघर गोठे’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जनावरांचे गोठे बांधता येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने ‘हर घर गोठे- घरघर गोठे’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात गाय, म्हशीसाठी छतविरहीत गोठ्यासह, बचत गटांसाठी सामूहिक गोठे, कुक्कुटपालन शेड, शेळीपालन शेड अशी कामे होती घेता येणार आहेत. या सर्व कामांसाठी केंद्र सरकार योजनेअंतर्गत ३५ हजार रुपयांचे अनुदान मजुरीपोटी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली. 

‘हर घर गोठे- घरघर गोठे’ योजनेतून जनावरांसाठी छतविरहित गोठ्यात पक्के तळ, गव्हाण, मूत्रसंचय टाकी बांधण्यात येणार आहे. यात ६ गुरांकरिता २६.९५ चौरस मीटर निवारा पक्की जमिनीवर लांबी ७.७ मीटर आणि रुंदी ३.५ मीटर आकारात जमीन सिमेंट काँक्रीटचे तळ बांधण्यात येणार आहे. ७.७ मीटर बाय लांब, ०.२ मीटर रुंद, ०.६५ मीटर उंच आकाराची गव्हाण आणि २५० लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाकी बांधण्यात येणार आहे. या कामासाठी मजुरीवर येणारा खर्च कमी असेल. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन असलेले लाभार्थी पात्र असतील. 

कुक्कुटपालन शेड 
कुक्कुट पक्ष्यांचे ऊन, पाऊस, परभक्षी जनावरे व वारंवार येणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध असणे आवश्यक आहे. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी पक्ष्यांचे, पिल्लांचे व अंड्याचे परभक्षी प्राण्यांपासून संरक्षण होण्यास मदत होते. योजनेतून कुक्कुटपालन शेडसाठी १०० पक्ष्यांना ७.५० चौरस मीटर निवारा उभारण्यात येणार असून, त्याची लांबी ३.७५ मी आणि रुंदी २ मी ठेवण्यात येईल. 

शेळीपालन शेड 
अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेळीपालन या व्यवसायाकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केलेल्या प्रत्येक कुटुंबास शेळीपालन शेड (निवारा) हे काम उपलब्ध करून देण्यात येईल. शेड बांधण्यासाठी १० शेळ्यांकरिता ७. ५० चौरस मीटरचा निवारा करण्यात येणार असून, यात लांबी ३.७५ मीटर व रुंदी २ मीटर असेल. 

बचत गटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे 
छतविरहित गोठ्याप्रमाणेच बचत गटांच्या जनावरासाठीच्या सामूहिक गोठ्यांची योजना राबविण्यात येणार आहे. या कामाला ६ जनावरांसाठी ३५ हजार रुपयांचे अनुदान मजुरीपोटी उपलब्ध होणार आहे. बचत गटाची जनावरांचे सामुदायिकरीत्या संगोपन करण्याचा उद्देश असल्याने जनावरांच्या प्रमाणात या कामाचे अंदापत्रक तयार करण्यात येणार आहे. गोठ्याचे छतासह काम हाती घ्यावयाचे असल्यास पशुसंवर्धन विभागाची योजना व रोजगार हमी या दोन्ही योजनांच्या निधी वापरावा लागणार असून, त्यासाठी वेगळी अंदाजपत्रके तयार करण्यात येतील. 

प्रतिक्रिया...
गोठे सिमेंट कॉक्रीटचा वापर करुन पक्क्या स्वरूपात सपाटीकरण केल्यास मूत्र व शेणाचा संचय करून, शेतजमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करून घेता येईल. लाभा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा. 
- बाबुराव वायकर, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती 

 


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...