पंढरपुरात माघवारीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

पंढरपुरात माघवारीनिमित्त  वाहतूक मार्गात बदल
पंढरपुरात माघवारीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

पंढरपूर, जि. सोलापूर  : पंढरपुरात येत्या बुधवारी (ता. ५) माघ वारी सोहळा होत आहे. यानिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहराबाहेरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, हा बदल रविवारपर्यंत (ता. ९) राहणार आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना सूचना: पंढरपूरात यात्रेनिमित्त नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्क करावीत. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी किंवा कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाउस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने बिडारी बंगला किंवा कासेगाव फाटा, टाकळी बायपास मार्गे येऊन टाकळी हायस्कूल व वेअर हाउस येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढामार्गे येणारी वाहने कासेगाव, कासेगाव फाटामार्गे येऊन यमाई-तुकाई मंदिर किंवा बिडारी बंगला येथे पार्क करावी. अथवा सदर वाहने कासेगाव फाटा, टाकळी बायपास मार्गे येऊन टाकळी हायस्कूल व वेअर हाउस येथे पार्क करावीत. पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना: पंढरपूर शहरातून टेंभूर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, करकंब चौक मार्गे जातील. पुणे-साताऱ्याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, वाखरीमार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, गादेगाव फाट्यापासून जातील. पंढरपूर शहरातीलअंतर्गत वाहतुकीबाबत : १ ते ९ फेब्रुवारीपर्यंत प्रदक्षिणा मार्ग, महाव्दार चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरून येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगणापर्यंत जातील. नियमित येणारे ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेसना जुना दगडी पूल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, सावरकर चौक ते अर्बन बँक, भक्ती मार्ग ते काळा मारुती चौक हा मार्ग वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे. शहराबाहेरून जाणाऱ्या वाहतुकीबाबत ः  सोलापूर, बार्शी, नगर बाजूकडून नियमितपणे पंढरपूरमार्गे बाह्यवळण मार्गावरून वेळापूर, अकलूज, महुद, सांगोला, मंगळवेढाकडे जाणाऱ्या वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, अहिल्या चौक येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंदी आहे. ही वाहने मोहोळ, कामती, मंगळवेढा, सांगोला किंवा शेटफळ, टेंभूर्णी, वेळापूर, साळमुख फाटा, महुद, सांगोला मार्गे या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील. जड वाहतुकीला बंदी विजापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, आटपाडी, पुणे बाजूकडून नियमितपणे येऊन पंढरपूरमार्गे बाह्यवळण मार्गावरून टेंभुर्णी, शेटफळ, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोलाकडे जाणारी जड व अवजड वाहने, गॅस टँकर, केरोसीन, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर, शासकीय अन्न-धान्य वाहतूक करणारी वाहने कुरुल फाटा, मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महुद फाटा, साळमुख फाटा, श्री ज्ञानेश्वर चौक, वेळापूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास बंदी आहे, ही वाहने कामती, मंगळवेढा, सांगोला, महुद, वेळापूर, अकलूज, टेंभुर्णी या पर्यायी मार्गे इच्छितस्थळी जातील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com