agriculture news in Marathi maghi wari festival cancels due to corona Maharashtra | Agrowon

पंढरपुरातील माघी यात्रेचा आजचा सोहळा रद्द

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी-कार्तिकीप्रमाणेच यंदाही माघी वारीचा सोहळा रद्द कऱण्यात आला आहे. आज (ता.२३) माघी वारीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. 

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी-कार्तिकीप्रमाणेच यंदाही माघी वारीचा सोहळा रद्द कऱण्यात आला आहे. आज (ता.२३) माघी वारीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. परंतु पोलिस आणि प्रशासनाने पंढरपुरातील गर्दी टाळण्यासाठी २२ व २३ फेब्रुवारी रोजी दर्शन बंद ठेवले आहे. तसेच पंढरपूरसह परिसरातील दहा गावात संचारबंदी लागू करण्यात केली आहे, त्यामुळे यंदा आषाढी-कार्तिकीप्रमाणेच माघी वारीही घरीच बसून साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मंगळवारी हा मुख्य सोहळा होत आहे. या काळात मंदिरातील ठरलेले रोजचे नित्योपचार पूर्ण होतील. परंतु मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. आषाढी-कार्तिकीप्रमाणेच माघी वारीलाही विशेष महत्त्व आहे. या वारीसाठी राज्यातील विविध भागांतून दिंड्या येतात. परंतु या दिंड्यांना, भाविकांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून जिल्हा, तालुका आणि शहर अशी त्रिस्तरीय नाकाबंदी केली आहे.

भाविकांनी मठात थांबू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व शहरातील सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, विनामास्क घराबाहेर पडू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.  

गर्दीसाठी प्रतिबंध
माघी यात्रा कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मठामध्ये वास्तव्यास असलेल्या भाविकांना मठ सोडण्याचे आवाहन करून नव्याने येणाऱ्या भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून मठ, धर्मशाळा, ६५ एकर परिसर, चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली. 

पाच जणांच्या उपस्थितीत आज महापूजा
माघी वारीचा आज (मंगळवारी) मुख्य सोहळा होत आहे, या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा, नैवेद्य मंदिर समितीच्या एक सदस्यासह (सपत्नीक) पाच जणांच्या उपस्थितीत महापूजा होईल. त्या कालावधीत संबंधितांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. पूजेच्या वेळेत पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी, समिती व सल्लागार परिषदेचे सदस्य, अधिकारी उपस्थित राहतील.
 


इतर ताज्या घडामोडी
पांडुरंग साखर कारखाना उताऱ्यात...सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याने २५ लाख ७७...
अकोला झेडपीच्या कृषी विभागाचे दहा...अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाला आगामी आर्थिक...
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नाशिक : जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या...
कपाशीचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज ः...नांदेड ः ‘‘जगाच्या तुलनेत आपल्या देशात कपाशीची...
खानदेशातील तुरीच्या आवकेत ४० टक्के घटजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या : आंबा...मुंबई : कोकण किनारपट्टीच्या भागात १८ व १९...
पारनेर : महावितरणच्या विरोधात शेतकरी...निघोज, ता. पारनेर : विहिरीत पाणी असूनही पिकांना...
खानदेशात ऊसगाळप राहणार मार्चअखेरपर्यंत...जळगाव ः  खानदेशात सुमारे १६ लाख टन ऊस गाळप...
कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन,...कोल्हापूर : आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी...
शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका ः डॉ. पवारनाशिक : ‘‘वीज महावितरणच्या मनमानी...
संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष...नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात...
सिंधुदुर्गमध्ये होणार ड्रोनद्वारे होणार...सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गत...
मराठीला अभिजात दर्जा मिळविणारच :...मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला,...
खामसवाडीत नुकसानग्रस्त पिकांची होणार...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : परिसरात १९ फेबुवारी...
किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया...जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के...
नगर जिल्ह्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांना...नगर ः जिल्ह्यातील २०१९ - २० चा खरीप व रब्बी हंगाम...
सोसायट्यांच्या वसुलीपूर्वी प्रोत्साहन...सातारा : आता मार्च महिन्यात सोसायट्यांची...
केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनएकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे पिकास...
सकाळी थंड, तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
अकोला : अवकाळी, गारपीटग्रस्तांना १७...अकोला ः गेल्या वर्षात जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे...