agriculture news in Marathi maghi wari festival cancels due to corona Maharashtra | Agrowon

पंढरपुरातील माघी यात्रेचा आजचा सोहळा रद्द

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी-कार्तिकीप्रमाणेच यंदाही माघी वारीचा सोहळा रद्द कऱण्यात आला आहे. आज (ता.२३) माघी वारीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. 

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी-कार्तिकीप्रमाणेच यंदाही माघी वारीचा सोहळा रद्द कऱण्यात आला आहे. आज (ता.२३) माघी वारीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. परंतु पोलिस आणि प्रशासनाने पंढरपुरातील गर्दी टाळण्यासाठी २२ व २३ फेब्रुवारी रोजी दर्शन बंद ठेवले आहे. तसेच पंढरपूरसह परिसरातील दहा गावात संचारबंदी लागू करण्यात केली आहे, त्यामुळे यंदा आषाढी-कार्तिकीप्रमाणेच माघी वारीही घरीच बसून साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मंगळवारी हा मुख्य सोहळा होत आहे. या काळात मंदिरातील ठरलेले रोजचे नित्योपचार पूर्ण होतील. परंतु मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. आषाढी-कार्तिकीप्रमाणेच माघी वारीलाही विशेष महत्त्व आहे. या वारीसाठी राज्यातील विविध भागांतून दिंड्या येतात. परंतु या दिंड्यांना, भाविकांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून जिल्हा, तालुका आणि शहर अशी त्रिस्तरीय नाकाबंदी केली आहे.

भाविकांनी मठात थांबू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व शहरातील सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, विनामास्क घराबाहेर पडू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.  

गर्दीसाठी प्रतिबंध
माघी यात्रा कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मठामध्ये वास्तव्यास असलेल्या भाविकांना मठ सोडण्याचे आवाहन करून नव्याने येणाऱ्या भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून मठ, धर्मशाळा, ६५ एकर परिसर, चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली. 

पाच जणांच्या उपस्थितीत आज महापूजा
माघी वारीचा आज (मंगळवारी) मुख्य सोहळा होत आहे, या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा, नैवेद्य मंदिर समितीच्या एक सदस्यासह (सपत्नीक) पाच जणांच्या उपस्थितीत महापूजा होईल. त्या कालावधीत संबंधितांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. पूजेच्या वेळेत पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी, समिती व सल्लागार परिषदेचे सदस्य, अधिकारी उपस्थित राहतील.
 


इतर बातम्या
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
विदर्भात तापमान चाळिशीपार पुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ...
पीकविम्यासाठी राज्य नवीन धोरण आणणार :...मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या...
अर्थव्यस्थेच्या घसरणीला ‘कृषी’चा टेकूपुणे ः कोरोना विषाणूच्या विळख्याने देशासह...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
नारायणगाव येथे होणार टोमॅटो प्रक्रिया...पुणे : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
सेंद्रिय शेतीमालाबाबत सर्वंकष धोरण...सोलापूर ः शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे...