‘महा’ चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार

‘महा’ चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार
‘महा’ चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार

पुणे : अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. हे चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्रीनंतर गुजरात किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज होता. मात्र, ‘महा’ चक्रीवादळ आज (ता. ७) दुपारपर्यंत किनारपट्टी ओलांडून जमिनीवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुजरातसह उत्तर कोकणातील पालघर, ठाणे व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

बुधवारी (ता. ६) सकाळी ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या वेरावळपासून ४९० किलोमीटर, तर दीवपासून ५४० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ४५० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. ही प्रणाली हळूहळू किनारपट्टीकडे येत आहे. आज (ता. ७) दुपारी हे चक्रीवादळ ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दीवजवळ गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीलगत समुद्रात उंच लाटा उसळणार आहेत. 

या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

‘बुलबुल’ चक्रीवादळाची निर्मिती होणार पश्चिम किनारपट्टीला ‘महा’ वादळ धडकत असतानाच आज (ता. ७) बंगालच्या उपसागरात ‘बुलबुल’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. बुधवारी उत्तर अंदमान समुद्रात कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार झाले होते. ही प्रणाली अंदमानच्या माया बेटांपासून ३९० किलोमीटर वायव्येकडे, तर ओडिशाच्या परादीपपासून ८१० किलोमीटर पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात घोंघावत होते. हे चक्रीवादळ काही काळ ओडिशाच्या दिशेने येऊन, नंतर उत्तरेकडे पश्चिम बंगालकडे जाण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com