Agriculture news in Marathi, Maha cyclone will hit Gujarat today | Page 2 ||| Agrowon

‘महा’ चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

पुणे : अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. हे चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्रीनंतर गुजरात किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज होता. मात्र, ‘महा’ चक्रीवादळ आज (ता. ७) दुपारपर्यंत किनारपट्टी ओलांडून जमिनीवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुजरातसह उत्तर कोकणातील पालघर, ठाणे व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे : अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. हे चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्रीनंतर गुजरात किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज होता. मात्र, ‘महा’ चक्रीवादळ आज (ता. ७) दुपारपर्यंत किनारपट्टी ओलांडून जमिनीवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुजरातसह उत्तर कोकणातील पालघर, ठाणे व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

बुधवारी (ता. ६) सकाळी ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या वेरावळपासून ४९० किलोमीटर, तर दीवपासून ५४० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ४५० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. ही प्रणाली हळूहळू किनारपट्टीकडे येत आहे. आज (ता. ७) दुपारी हे चक्रीवादळ ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दीवजवळ गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीलगत समुद्रात उंच लाटा उसळणार आहेत. 

या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

‘बुलबुल’ चक्रीवादळाची निर्मिती होणार
पश्चिम किनारपट्टीला ‘महा’ वादळ धडकत असतानाच आज (ता. ७) बंगालच्या उपसागरात ‘बुलबुल’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. बुधवारी उत्तर अंदमान समुद्रात कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार झाले होते. ही प्रणाली अंदमानच्या माया बेटांपासून ३९० किलोमीटर वायव्येकडे, तर ओडिशाच्या परादीपपासून ८१० किलोमीटर पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात घोंघावत होते. हे चक्रीवादळ काही काळ ओडिशाच्या दिशेने येऊन, नंतर उत्तरेकडे पश्चिम बंगालकडे जाण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


इतर बातम्या
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
नाशिक : खरीप पीकविमा योजनेसाठी ३१...नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...