सांगली जिल्ह्यात महाआघाडीचे ‘कमबॅक’

सांगली जिल्ह्यात महाआघाडीचे ‘कमबॅक’
सांगली जिल्ह्यात महाआघाडीचे ‘कमबॅक’

सांगली : जिल्ह्यात लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायती अशी एकापाठोपाठ सत्ताकेंद्रे ताब्यात घेत निघालेल्या भाजपसाठी या वेळी निवडणूक सहज सोपी वाटत होती. भाजप २०१४ इतक्याच जागेवर ठाम होती. तसा प्रचारदेखील केला. त्यामुळे भाजपला यश कायम राखता येईल, अशा विश्वास होता. मात्र, जनतेने कौल वेगळा दिला. जिल्ह्यातील आठपैकी तीन जागांवर यश मिळवत राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष ठरला. काँग्रेस व भाजपने प्रत्येकी दोन, तर शिवसेनेने एक जागा कायम राखण्यात यश मिळवले. या निकालाने जिल्ह्यात महाआघाडीने पुन्हा एकदा ‘कमबॅक’ केले. महायुती मात्र बॅकफूटवर गेली.

लोकसभेनंतर जिल्ह्यात भाजपचे वारे ग्रामीण भागात फिरले. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांनी सव्वा लाखाचे मताधिक्‍य घेतले. राष्ट्रवादी, काँग्रेसमधील पदाधिकारी आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पक्षांतराचाही सपाटा कायम होता; त्यामुळे भाजप सध्याचे यश कायम राखेल, असे वातावरण भाजप नेत्यांनी तयार केले. 

महायुतीतील जागावाटपात भाजपने इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि पलूस कडेगाव येथील जागा शिवसेनाला सोडल्या. त्यामुळे महाआघाडीने पहिल्या टप्प्यातच विद्यमान तीन जागा कायम ठेवल्याचे चित्र निर्माण झाले. विद्यमान चारपैकी दोन जागा भाजपला गमवाव्या लागल्या.  

पलूस-कडेगावची जागा महायुतीत सेनेच्या वाट्याला गेली. संग्रामसिंह देशमुख लढत देतील, असेच गृहीत धरले होते. देशमुख यांनी माघार घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात ‘नोटा’ची भूमिका घेतली. परिणामी, या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची २० हजार ६३१ मते ‘नोटा’ला मिळाली. आता नव्याने झालेले आमदार विक्रम सावंत यांना जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली ताकद पणाला लावावी लागेल.  

मतदारसंघ उमेदवार (पक्ष)  मते
मिरज सुरेश खाडे (भाजप)  ९६३६९
सांगली सुधीर गाडगीळ ( भाजप) ९२३०६ 
जत विक्रमसिंह सावंत (काँग्रेस) ८७१८४ 
तासगाव-कवठेमहांकाळ सुमन पाटील (राष्ट्रवादी) १२८३७१ 
खानापूर  अनिल बाबर (शिवसेना) १००३४४ 
पलूस-कडेगाव विश्‍वजित कदम (काँग्रेस)  १७१४९७ 
शिराळा  मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी)  ८८३४० 
इस्लामपूर जयंत पाटील (राष्ट्रवादी) ८७८५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com