महाबळेश्वरचे स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत

Mahabaleshwar's strawberry growers in trouble
Mahabaleshwar's strawberry growers in trouble

सातारा ः स्ट्रॉबेरी हंगाम सुरुवातीपासून संकटाच्या गर्तेत सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर परिसरात ढगाळ हवामान झाल्याने स्ट्रॉबेरीची फळे कुजू लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विविध संकटामुळे उत्पादन घट होत असल्याने घेतलेले कर्जही भरता येणार नसल्याचे शेतकरी सांगत आहे.  

महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक असून, या तालुक्यात अडीच हजार एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे ५०० एकर क्षेत्रावर घट झाली आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासून संकटे सुरू झाली आहेत. अतिपावसाचा सुरुवातीस रोपांना फटका बसला. रोपात पाणी साचल्याने रोपे कुजली गेली. याचा साहजिकच क्षेत्रावर झाला. स्ट्रॉबेरीची लागवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची स्ट्रॉबेरी पाण्याखाली गेली होती. 

या अतिपाण्यामुळे स्ट्रॉबेरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. सततच्या पावसामुळे शेतात पाणी निघत नव्हते. एकूण क्षैत्रापैकी एक हजार एकर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरी मर रोगाने गेल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. याचा उत्पादनावर परिणाम होणार असून, जवळपास २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या पूर्व भाग, तसेच जावळी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यानंतर वन्यप्राण्यांकडूनही नुकसान झाले. 

मॉन्सूनोत्तर पावसामुळे लागवड लांबल्याने दिवाळीच्या सणाच्या तोंडावर मिळणाऱ्या चांगल्या दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. त्यात भर पडून आता ढगाळ हवामान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी वाचविण्यासाठी फवारण्या केल्या जात आहे. यामुळे भांडवली खर्चातही वाढ होत आहे. ऐन बहरात संकटाने शेतकरी हैराण झाले आहेत.

कर्जमाफीचा लाभ नाहीच महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक झाले आहे. एकरी या पिकांसाठी तीन ते साडेतीन लाख रुपये पीककर्ज मिळते. भांडवलासाठी बहुतांशी शेतकऱ्यांकडून कर्ज घेतले जाते. राज्य सरकारने थकीत कर्जदारांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. यामुळे बहुतांशी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.  

एकामागून एक संकटे येत असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. सध्या हवामान बदलामुळे फळे कुजू लागली आहे. विविध संकटांमुळे भांडवली खर्चही निघणार नाही. - गणपत पार्टे, प्रगतिशील शेतकरी, भिलार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com