महाबीज देणार पुढील वर्षीच्या हंगामात बीटी बियाणे

महाबीज देणार पुढील वर्षीच्या हंगामात बीटी बियाणे
महाबीज देणार पुढील वर्षीच्या हंगामात बीटी बियाणे

नागपूर : महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्‍वासित केल्याप्रमाणे बीटी वाणांचा पुरवठा २०१९ च्या खरीप हंगामात केला जाईल, अशी माहिती महाबीजने पत्रकातून दिली आहे. महाबीजचे बीटी वाण बोंडअळीने पोखरले या ‘ॲग्रोवन’मधील वृत्तानंतर महाबीजने हा खुलासा केला आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या सहकार्याने महाबीज बीटी वाण बाजारात आणणार आहे. पीकेव्ही हायब्रीड-२ आणि एनएचएच-४४ या वाणांमध्ये बीजी-२ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव त्याकरीता केला जाईल. महिको मोन्सॅटोसोबत त्याकरिता करार करण्यात आला आहे.  केंद्रानंतर राज्य शासनाने या दोन्ही वाणांना विपणनाकरिता २७ फेब्रुवारी २०१८ रोजी मान्यता दिली आहे.  सद्यःस्थितीत हे दोन्ही वाण बीजोत्पादन प्रक्रियेत असून पुढील वर्षी खरीप २०१९ च्या हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध केले जातील. तत्पूर्वी गुजरात व कर्नाटक राज्यात प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमातून प्राप्त झालेल्या संकरित बियाण्यांमधून खरीप २०१८ या हंगामात विद्यापीठ व महाबीज स्तरावर दोन्ही वाणांचे पीक प्रात्याक्षिक घेण्यात येणार आहे. बीटी वाण विकसित करण्याकरिता कमीत कमी तीन वर्षांचा कालावधी, त्यानंतर मूलभूत व पायाभूत बियाणे तयार करण्याची प्रक्रिया व त्यानंतर संकरित बीजोत्पादन हा सर्व कालावधी लक्षात घेऊन महाबीज व कृषी विद्यापीठ यांनी या वाणांचे बियाणे खरीप २०१९ या हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याबाबत आश्‍वासित केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com