‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन बीजोत्पादन

‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा जिल्ह्यांमध्ये यंदा प्रथमच उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत २१० हेक्टरवर पेरणी झाली आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी दिली.
Mahabeej produces soybean seeds on 210 hectares
Mahabeej produces soybean seeds on 210 hectares

परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा जिल्ह्यांमध्ये यंदा प्रथमच उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत २१० हेक्टरवर पेरणी झाली आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी दिली.

गतवर्षीच्या (२०२०) खरिपात ऐन काढणीच्या हंगामात पाऊस आल्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची प्रत खराब झाली आहे. परिणामी, उगवणशक्ती कमी होण्याची समस्या येऊ शकते. बियाणे तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जेएस ३३५ आणि केडीएस ७५३ या वाणांचा बीजोत्पादन ३४० हेक्टरवर घेण्याचे उद्दिष्ट होते. परंतु २१० हेक्टरवर पेरणी केली आहे.

सोयाबीनचे पीकवाढीच्या अवस्थेत आहे. उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी बियाण्याची शुद्धता राखण्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार पीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन सोनोने यांनी केले आहे.

रब्बीत चार हजार २९० हेक्टरवर बीजोत्पादन यंदाच्या (२०२०-२१) रब्बी हंगामात परभणी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण ४ हजार २९३ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येत असून, एकूण ६७ हजार क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. पीकनिहाय बीजोत्पादन क्षेत्रामध्ये ज्वारी ११०.४० हेक्टर, हरभरा ३१७४ हेक्टर, गहू या प्रमुख पिकांचा समावेश आहे. जिल्हानिहाय बीजोत्पादन क्षेत्रात परभणी जिल्हा १५०६ हेक्टर, हिंगोली जिल्हा ७५४ हेक्टर, नांदेड जिल्हा ३९२ हेक्टर, लातूर जिल्हा ७८४ हेक्टर, उस्मानाबाद जिल्हा ६०८ हेक्टर, सोलापूर जिल्हा २४६ हेक्टरचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com