महाबीजने सोयाबीनची देयके द्यावी : शेतकऱ्यांची मागणी

महाबीच्या ढिसाळ कारभारामुळे सोयाबीनची अंतिम देयके मिळण्यास यंदा खूप उशीर झाला. पेरणी जवळ आली आहे. बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी न सांगता सर्व बीजोत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ अंतिम देयके अदा करावीत. - अशोक देशमुख, बीजोत्पादक शेतकरी, परभणी.
महाबीजने सोयाबीनची देयके द्यावी : शेतकऱ्यांची मागणी
महाबीजने सोयाबीनची देयके द्यावी : शेतकऱ्यांची मागणी

परभणी : महाजबीजद्वारे गेल्या खरीप हंगामातील सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची (प्रतिक्विंटल १ हजार ७७० रुपये) अंतिम देयके प्रलंबित आहेत. यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे प्रलंबित देयकांची रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी सोयाबीन बीजोत्पादक शेतकऱ्यांनी केली.

महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांत २०१८-१९ च्या खरीप हंगामात काढणीच्या वेळी पाऊस नव्हता. त्यामुळे २०१७-१८ च्या तुलनेत सोयाबीन बियाणे पासचे प्रमाण अधिक आहे. विभागात सोयाबीनचे एकूण ४ लाख ३७ हजार क्विंटल बिजोत्पादन झाले. २०१७-१८ मध्ये  ते २ लाख ५२ हजार क्विंटल इतके होते.

मागील वर्षी विभागातील एकूण ५ हजार ७३६ शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे बिज परिक्षण चाचण्यानंतर पास झाले. त्यापैकी ५ हजार १३१ शेतकऱ्यांच्या बियाण्यांची देयके प्रक्रिया केंद्रांकडून सादर करण्यात आली. त्यापैकी ४ हजार ५३६ शेतकऱ्यांना अंतिम देयके अदा करण्यात आली. सोयाबीन बीजोत्पादकांना प्रतिक्विंटल ४ हजार २७० रुपये याप्रमाणे दर दिला जाणार आहे. त्यापैकी २ हजार ५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. 

परंतु परभणीतील २७० शेतकरी, हिंगोलीतील १६५, नांदेडमधील ४९, लातूरमधील ६१, उस्मानाबादेतील ५० अशी एकूण ५९५ शेतकऱ्यांच्या प्रतिक्विंटल १ हजार ७७० रुपयांप्रमाणे उर्वरित अंतिम देयके प्रलंबित आहेत. 

महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड म्हणाले, ‘‘बीजोत्पादनात वाढ झाल्याने बीजप्रक्रिया, बीज परीक्षणाचे निकाल मिळण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अंतिम देयकाची रक्कम जमा करण्यासाठी यंदा उशीर झाला. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com