‘महाबीज’ देणार बीजोत्पादकांना अनुदान

कडधान्य, तृणधान्य पिकांच्या नवीन वाणाचे प्रमाणित व पायाभूत बियाणे मात्रेसाठी बीजोत्पादक शेतकऱ्यांना ५ कोटी ८१ लाख ११ हजार रुपये अनुदान दिले जाणार : महाबीज
Mahabeej will provide subsidy to seed growers
Mahabeej will provide subsidy to seed growers

अकोला ः सन २०१८-१९ च्या खरीप, रब्बी हंगामामध्ये उत्पादित झालेल्या कडधान्य तथा पौष्टिक तृणधान्य या पिकांच्या नवीन वाणाचे प्रमाणित व पायाभूत बियाणे मात्रेसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बीजोत्पादक शेतकऱ्यांना ५ कोटी ८१ लाख ११ हजार रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे मंगळवारी (ता. २२) झालेल्या ‘महाबीज’च्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले. महाबीजचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे जाहीर केले.

महाबीजच्या येथील मुख्यालयात ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाइन पद्धतीने सभा झाली. ऑनलाइन सभेत शंभरावर भागधारक  लातूर, परभणी, नांदेड आदी ठिकाणांहून ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. संचालक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, शासनाचे प्रतिनिधी म्हणून गणेश पाटील, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. विलास खर्चे, बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक श्री. रेणापूरकर हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी होते. तर श्री. पापळकर, संचालक वल्लभराव देशमुख, महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने, अजय कुचे, प्रशांत पागृत, मनीष यादव हे प्रत्यक्षरीत्या महामंडळाच्या मुख्य कार्यालयात उपस्थित होते.

भागधारकांचे प्रश्‍न निकाली काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांनी प्रत्यक्ष महाबीज जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन संबंधित जिल्ह्यातील भागधारकांचे चर्चासत्र आयोजित करावे आणि व्यवस्थापन व भागधारक यांच्यामधील सुसंवाद वाढवावा असे श्री. डवले यांनी सूचित केले. महाबीजच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेस उत्कृष्ट बियाणे परीक्षण प्रयोगशाळेचा पुरस्कार प्राप्त झाला ही प्रशंसनीय बाब असून, यापुढे गुणवत्ता धोरण कठोर करणे बाबतचे निर्देशही त्यांनी दिले. श्री. देशमुख यांनी भागधारकांचे प्रश्‍न मांडले.

कर्मचाऱ्यांचा संप मिटला सातवा वेतन आयोग व इतर प्रमुख मागण्यांसाठी ९ डिसेंबरपासून सुरू असलेला कर्मचाऱ्यांचा संप मंगळवारी मागे घेण्यात आला. महाबीज प्रशासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती महाबीजतर्फे देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com