Mahabeez
Mahabeez

`महाबीज’ला ‘एमडी’च मिळेना 

राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ‘नापसंती’चे ठिकाण बनले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ‘नापसंती’चे ठिकाण बनले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी येथे येण्यास इच्छुकच नसल्याचे वारंवार स्पष्ट होऊ लागले आहे. 

डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १७ फेब्रुवारीला महाबीज मुख्यालय गाठले. आल्या आल्या कामकाजाचा आढावा घेतला. नंतर अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती झाल्याचे आदेश धडकले. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केल्या गेली. यालाही आता महिना लोटला. मात्र रेखावार हे सुद्धा अद्याप रुजू झालेले नाहीत.  कुणीही पूर्णवेळ अधिकारी नसल्याने सध्या या पदाची अतिरिक्त जबाबदारी जी. श्रीकांत औरंगाबादेतून सांभाळत असल्याचे समजते. नियुक्ती केलेले रेखावार यांची इच्छा नसल्याची चर्चा महामंडळाच्या मुख्यालयात ऐकायला मिळते आहे. आता हंगामापूर्वी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती होऊ शकते. नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नासपसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्‍चर्य व्यक्त होत आहेत. 

महत्त्वाची पदेही रिक्त  महाबीजच्या कारभाराकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता शेतकरी करीत आहेत. एमडी सारखे पद एकीकडे रिक्त तर आहेच दुसरीकडे राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे प्रशासकीय अधिकारी (ॲडमिनीस्ट्रेटिव ऑफिसर) हे पद गेल्या तीन वर्षांपासून भरण्यात आलेले नाही. याशिवाय जनरल मॅनेजर उत्पादन (प्रॉडक्शन), जनरल मॅनेजर निर्मिती (प्रोसेसिंग) ही पदेही रिक्त आहेत.  प्रतिक्रिया  ‘महाबीज’मध्ये रिक्त असलेली महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे तातडीने शासनाने भरावीत, अशी मागणी मी वारंवार केली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत ही पदे भरण्याची मागणी मी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडेसुद्धा आता केली आहे.  - वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com