agriculture news in Marathi Mahabeez will provide four lac quintal soybean seed Maharashtra | Agrowon

चार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे महाबीज पुरविणार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

यंदाच्या हंगामात पीक काढणीदरम्यान सलग पाऊस झाल्याने सर्वच पिकांचा दर्जा खालावला होता. याची झळ शेतकऱ्यांना जशी बसली तसाच फटका बियाणे उत्पादक असलेल्या कंपन्यांनाही बसला.

अकोला ः यंदाच्या हंगामात पीक काढणीदरम्यान सलग पाऊस झाल्याने सर्वच पिकांचा दर्जा खालावला होता. याची झळ शेतकऱ्यांना जशी बसली तसाच फटका बियाणे उत्पादक असलेल्या कंपन्यांनाही बसला. यामुळे या हंगामासाठी बियाण्याची सहज उपलब्धता करणे कंपन्यांना सहज शक्य झालेले नाही. महाबीज सारख्या मोठ्या बियाणे पुरवठादार शासकीय उपक्रमाला हंगामासाठी बियाणे पुरवठा करताना काही तुट भरून काढण्यासाठी परराज्यातील बिजोत्पादकांची मदत घ्यावी लागत आहे. या अनुषंगाने लवकरच ई-निविदा प्रक्रीया सुरु केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) दरवर्षी खरीप हंगामासाठी बियाण्याचा सर्वाधिक पुरवठा करीत असते. यंदाही बियाणे पुरविण्याचे नियोजन अंतीम झाले आहे. त्यानुसार गेल्या चार वर्षातील लागवड क्षेत्राचा सरासरी आढावा घेत चार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. सोबतच तुरीचे १० हजार क्विंटल, मूग ३ हजार क्विंटल, उडीद ११५०० क्विंटल, संकरीत ज्वारी ६ हजार, धान ७० हजार क्विंटल आणि कापसामध्ये बीटी वाण असलेल्या नांदेड ४४ व पीकेव्ही २ या दोन वाणांची साधरणतः एक लाख पाकीटे पुरविली जाणार आहेत. 

यंदा सोयाबीनला अति पावसाचा फटका बसलेला आहे. महाबीज बीजोत्पादक शेतकरीही यातून सुटलेला नाही. दरवर्षी हंगामासाठी लागणारे बहुतांश बियाणे राज्यातील बिजोत्पादनातून उपलब्ध होत होते. यंदा मात्र यात तुट आलेली आहे. त्यामुळे बियाण्याची गरज पुर्ण करण्यासाठी महाबीज लवकरच ऑनलाईन ई-निवादा प्रक्रीया राबविणार असून याद्वारे बियाण्याची उपलब्धता करून घेतली जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात ही प्रक्रीया केली जात आहे.

हंगामात सोयाबीनचे लागवड क्षेत्र वाढले तर बियाण्याची उणीव भासू नये यासाठी कृषी विभागाकडून घरचे बियाणे प्रक्रीया करुन वापरण्याबाबत आधीच जनजागृती सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे बियाण्याची टंचाई भासण्याची शक्यता नसल्याचाही दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. 

हंगामासाठी हवे असलेल्या बियाण्याची ९० टक्के प्रोसेसिंग पुर्ण होत आलेली आहे. आता बियाण्याच्या वाहतुकीसाठी संबंधित प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी काढून पुरवठा सुरु केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी बंद असलेल्या वाहतुकीमुळे पुरवठा होऊ शकला नव्हता. आता मात्र ही प्रक्रीया सुरळीतपणे सुरु झाल्याचे सांगण्यात आले. 

महाबीजकडून असा होणार बियाणे पुरवठा (क्विंटलमध्ये) 
सोयाबीनः
४ लाख 
तूरः १० हजार 
मूगः ३ हजार 
उडीदः ११ हजार ५०० 
संकरीत ज्वारीः ६ हजार 
धानः ७० हजार 
कापूसः १ लाख पाकिटे (नांदेड ४४ व पीकेव्ही २) 

खासगी कंपन्यांना राज्यात फटका 
महाबीज प्रमाणेच राज्यात विविध बियाणे कंपन्यांकडून बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. यंदा या खासगी कंपन्यांना सोयाबीन व इतर पिकांचे बियाणे उपलब्ध करून घेताना मोठी अडचण आलेली आहे. राज्याला जवळपास १६.५७ लाख क्विंटल बियाण्याची गरज असते. यामध्ये महाबीजकडून पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक पुरवठा केला जाईल. उर्वरित बियाणे राष्ट्रीय बियाणे महामंडळ व खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे. ही गरज पुर्ण करण्यासाठी कंपन्यांकडून इतर राज्यातून बियाणे आवक करण्याची वेळ यंदा आलेली आहे. दरवर्षी या कंपन्या इतर राज्यातील बियाणे आणत असतात परंतु यंदा महाराष्ट्रात झालेले मोठे नुकसान पाहता त्यांची ही गरज दरवर्षीच्या तुलनेत वाढलेली आहे. इतर राज्यांवर खासगी कंपन्यांना अधिक अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांचे बियाणे कदाचित महाग झालेले दिसू शकते. अद्याप दर जाहीर झालेले असून पुढील काही दिवसात दरांचे चित्र स्पष्ट होईल. 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...