महाबीजचे सहा जिल्ह्यांत ४ हजार हेक्टरवर बीजोत्पादन

Mahabij has seeded on 4000 hectares in six districts
Mahabij has seeded on 4000 hectares in six districts

परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा जिल्ह्यांतील ७७४ गावांतील २ हजार ३९७ शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामामध्ये ४ हजार १३३ हेक्टरवरील बीजोत्पादन कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती महाबीजच्या सूत्रांनी दिली.

महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांच्या पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यांच्या बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे.

ज्वारीच्या परभणी मोती, परभणी ज्योती, फुले अनुराधा, फुले वसुधा, फुले रेवती, गव्हाच्या लोक १, राज ४०३७, एचआय १५४४ (पूर्णा), करडईच्या पीबीएनएस -१२, पीबीएन -८६, फुले एसएसएफ ७०८, एसएसएफ ७४८, हरभऱ्याच्या जाकी ९१८, बीडीजीएनके ७९८, राजविजय २०२, राजविजय २०३, दिग्विजय, विजय, फुले विक्रम, विशाल या वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये समावेश आहे. 

या सहा जिल्ह्यांतील एकूण २ हजार ३०८ शेतकऱ्यांनी ३ हजार ९७६ हेक्टरवरील प्रमाणित बीजोत्पादनासाठी, ८९ शेतकऱ्यांनी १५७.२० हेक्टरवरील पायाभूत बीजोत्पादन कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे, असे महाबीजच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय बीजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा क्षेत्र शेतकरी संख्या
परभणी १५०९.२ ८७५
हिंगोली ७२४.४० ५०८
नांदेड  ३५०.२ २०३
लातूर ७८७.६ ५०९
उस्मानाबाद ५७९.२ २५१
सोलापूर १८१.६ ५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com