परभणी विभागात महाबीजचा २८ हजार ५८७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम

परभणी विभागात महाबीजचा २८ हजार ५८७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम
परभणी विभागात महाबीजचा २८ हजार ५८७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम

परभणी : यंदाच्या (२०१९-२०) खरीप हंगामामध्ये महाबीजच्या परभणी विभागंतर्गतच्या सहा जिल्ह्यांमध्ये २८ हजार ५८७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यासाठी ११ हजार ४५९ शेतकऱ्यांनी महाबीजकडे नोंदणी केली आहे. या संदर्भात महाबीजच्या सूत्रांनी माहिती दिली.

महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कपाशी, ज्यूट, बाजरी या पिकांचा मिळून एकूण २८ हजार ५८७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  या सहा जिल्ह्यांतील एकूण ११ हजार ४५९ शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे.

यंदा सोयाबीनचे सर्वाधिक म्हणजे २७ हजार ७३८ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येत आहे. गतवर्षी २९ हजार ७१६ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला होता. यंदा पुरेशा पावसाअभावी खरीप बीजोत्पादन क्षेत्रात घट झाली आहे. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हानिहाय बीजोत्पादन कार्यक्रम क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा क्षेत्र
परभणी ८९३९
हिंगोली ७५२०
नांदेड १९४५
लातूर ६५९७
उस्मानाबाद ३२०९
सोलापूर ३७९

पीकनिहाय शेतकरी संख्या, बीजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक शेतकरी संख्या क्षेत्र
सोयाबीन  १०९३६ २७७३८
मूग ७९  १३६
उडीद १०५  १८४
तूर २६१  ४०६
ज्यूट  ३४ १०५
कापूस ३९ १०
बाजरी ५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com