‘महाडीबीटी’मध्ये ‘सर्व्हर डाउन’चा खोडा

एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे.
agriculture department
agriculture department

पुणे ः कृषी विभागाने ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ‘शेतकरी योजना’या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी मुदत संपत येत असताना सर्व्हर डाउन होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरताना अडचणी येत असून, प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.  

कृषी विभागाच्या विविध योजनेत अर्ज करण्यासाठी ‘महाडीबीटी’ ही प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत होती. त्यानंतर कृषी आयुक्तांनी ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अर्ज भरत आहेत. आता अखेरचे काही दिवस राहिल्याने चांगल्याच अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे या अडचणी २५ डिसेंबरपासून अधिक प्रमाणात येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  

कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. ‘महाडीबीटी’ पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून अर्ज करू शकतात. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक ‘महाडीबीटी’ पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. 

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाइन लॉटरी, पूर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. प्रतिक्रिया  मी ‘महाडीबीटी’ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र एक जानेवारीपासून ‘महाडीबीटी’चे सर्व्हर डाउन असल्याने अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात वरिष्ठांनाही वेळोवेळी सांगितले, तरीही कोणताही मार्ग निघत नसल्याचे दिसून येते. - रघुनाथ शिंदे, कृषिनिष्ठ शेतकरी, खैरैनगर, ता. शिरूर

मी दोन ते तीन वेळा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘महाडीबीटी’चे सर्व्हर डाउन असल्याची कल्पना दिली. त्यामुळे मला अर्ज भरताना खूप अडचणी आल्या आहेत. वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनाही यामध्ये लक्ष घालून अडचण सोडविण्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. - हरी यादव, शेतकरी, ता. बारामती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com