रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव जानकर

महादेव जानकर
महादेव जानकर

हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष ५७ जागांची मागणी करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता. १९) श्री. जानकर यांनी संवाद साधला. या वेळी रासपाचे प्रदेश पदाधिकारी विनायक भिसे पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

श्री. जानकर म्हणाले, की मागील निवडणुकीत आमचे सहा जिल्हा परिषद सदस्य असताना विधानसभेच्या चार जागा दिल्या होत्या. मात्र, आता रासपाचे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे या वेळी विधानसभा निवडणुकीत आम्ही ५७ जागांची मागणी करणार आहोत. मराठवाड्यात प्रत्‍येक जिल्ह्यातून किमान एक विधानसभेची जागा रासपला सोडवून घेण्याबाबत आग्रह असणार आहे.  आतापर्यंत जागा वाटपासंदर्भात भाजप व शिवसेनेसोबत दोन बैठका झाल्‍या आहेत. काही दिवसांत तिसरी बैठक होणार आहे. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद मोठी आहे. त्या ठिकाणच्या जागा रासपला सोडण्यासाठी आम्ही आग्रही असणार असल्याचे त्यांनी स्‍पष्ट केले. 

मुंबई येथे रविवारी (ता. २५) रासपचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास सुमारे दहा लाख पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येणार असून पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल. मेळाव्यानंतरच शिवसेना व भाजप नेत्‍यासोबत बैठक होऊन जागा वाटपाचा निर्णय होणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com