agriculture news in Marathi, Mahadev Jankar Says, proposal for provide food | Agrowon

पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव : महादेव जानकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर पोल्ट्री व्यवसायाला मदतीचा हात देण्याकरिता सरकारी कोट्यातील धान्य वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिले.

पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर पोल्ट्री व्यवसायाला मदतीचा हात देण्याकरिता सरकारी कोट्यातील धान्य वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिले.

महाराष्ट्रातील लेअर  पोल्ट्रीधारकांनी मंगळवारी (ता. ३०) मुंबईत श्री. जानकर यांची भेट घेतली. ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. पोल्ट्रीधारकांच्या वतीने राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे पुणे विभाग अध्यक्ष श्याम भगत, शेती अभ्यासक दीपक चव्हाण आणि मालेगाव येथील पोल्ट्रीधारक शशिकांत तिसगे यांनी सध्याच्या संकटाबाबत अडचणी व संभाव्य उपाययोजना मांडल्या.

आधीच दुष्काळामुळे घटलेले मका उत्पादन आता लष्करी अळीमुळे संकटात सापडले आहे. मागील सहा महिन्यांपासून अंडी व ब्रॉयलर उत्पादन खर्चात वाढ झाली असून, संपूर्ण व्यवसाय तोट्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर केंद्र - राज्य सरकारी कोट्यातील पशुआहारासाठी योग्य असे धान्य वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे. २००६ च्या बर्ड फ्लू संकटाच्या वेळी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले होते, तसेच ते या वेळीही करण्यात यावे.

तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर शालेय पोषणात दैनंदित तत्त्वावर अंडी पुरवठा करण्यात यावा, आदी उपाययोजनांवर चर्चा झाली. 
याप्रसंगी ज्येष्ठ पोल्ट्रीधारक राजू भोसले, प्रकाश बिरारी, संतोष पंजाबी, दिनेश हिरे, दादा माळी, एनईसीसी मुंबईचे अभय लाऊल, डॉ. लक्ष्मण तिसगे, विशाल ठाकूर, दिनेश मराळकर, शीतल सोनवणे यांच्यासह पुणे, नाशिक, धुळे येथील पोल्ट्रीधारक उपस्थित होते.

इतर अॅग्रोमनी
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...