agriculture news in marathi, mahajanadesh yatra start again, jalgaon, maharashtra | Agrowon

महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार येथून सुरवात

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला पुन्हा बुधवारपासून (ता. २१) नंदूरबार येथून सुरवात होणार आहे. खानदेशातील नंदुरबार, धुळे व जळगावात तीन दिवस ही यात्रा फिरेल. शुक्रवारी (ता. २३) यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुरात पोचेल, अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. 

नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला पुन्हा बुधवारपासून (ता. २१) नंदूरबार येथून सुरवात होणार आहे. खानदेशातील नंदुरबार, धुळे व जळगावात तीन दिवस ही यात्रा फिरेल. शुक्रवारी (ता. २३) यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुरात पोचेल, अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. 

या यात्रेचा हा दुसरा टप्पा असेल. बुधवारी मुख्यमंत्री नंदुरबार येथे सकाळी अकरा वाजता जाहीर सभेद्वारे नागरिकांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी दीड वाजता ते शहादा (जि. नंदुरबार) येथे सभा घेतील. शहाद्याहून यात्रा सारंगखेडामार्गे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे येईल. तेथे जाहीर सभेनंतर शिंदखेडामार्गे धुळे शहरात पोचेल. रात्री तेथे मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री धुळ्यात पत्रकार परिषद घेतील. 

धुळे येथून यात्रा जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला येईल. अमळनेरात स्वागत कार्यक्रम होईल. पुढे धरणगावमार्गे ही यात्रा जळगाव शहरात दुपारी दीड वाजता पोचेल. तेथे जाहीर सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील. त्यानंतर दुपारी तीन वाजता जामनेर येथे सभा होईल. सायंकाळी पाच वाजता भुसावळ येथे सभा होईल. गुरुवारी रात्री भुसावळ येथे यात्रेचा मुक्काम असेल. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता भुसावळ येथे पत्रकार परिषद होईल. तेथून अकरा वाजता बेदवड (जि. जळगाव) येथे यात्रेचे स्वागत होईल. तेथून ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरला दुपारी बारा वाजता पोचेल, असे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
उस्मानाबादेतील कर्जमुक्तीच्या याद्या...उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मराठवाड्यातील कोरड्या पडणाऱ्या...औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या...
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...