महाकृषी ऊर्जा अभियानाला  नगर जिल्ह्यात प्रतिसाद 

राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी दिली आहे. १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
Mahakrishi Urja Abhiyanala Response in Nagar district
Mahakrishi Urja Abhiyanala Response in Nagar district

नगर ः राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी दिली आहे. १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. शिवाय जिल्ह्यातील जवळपास ४ लाख शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील १६४९ कोटी ८३ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. एकरकमी योजनेच्या लाभातून सुमारे ९ हजार ३५६ शेतकऱ्यांची वीजबिले कोरी झाली आहेत. महावितरणकडून ही माहिती देण्यात आली.  राज्यात शेतकऱ्यांकडील वीजबिले थकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने वीजबिले भरावीत यासाठी कृषिपंपांची वीज तोडली जात आहे. पिकांना पाणी देण्याच्या कालावधीतच वीज तोडली जात असल्याने शेतकरी, राजकीय नेते, संघटनाचे प्रतिनिधी अक्रमक झाले आहेत. एकरकमी वीजबिले भरल्यास शेतकऱ्यांना धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकीची माफी देत महाकृषी योजना राबवली जात आहे.  नगर जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ८६८ शेतकऱ्यांकडे ५ हजार ३० कोटी ८२ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील १६४९ कोटी ८३ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन, तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे २ कोटी ५७ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे ३३७८.४२ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १६८९ कोटी २१ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १६८९ कोटी २१ लाख रुपयेही माफ होतील, असे महावितरणकडून सांगण्यात आले. 

१ लाख ६० हजार शेतकऱ्यांचा सहभाग  नगर जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ७७ कोटी ४३ लाखांचे चालू वीजबिल व ४५ कोटी ३१ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या शिवाय एकरकमी वीजबीले भरून जिल्ह्यातील ९ हजार ३५६ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ३८ कोटी २४ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ५ कोटी ८२ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे १९ कोटी १२ लाखांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे १९ कोटी १२ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com