परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
पंढरपुरात माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा
माघवारी जया शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मंगळवारी (ता. २३) मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली
पंढरपूर, जि. सोलापूर : माघवारी जया शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मंगळवारी (ता. २३) मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली. तर रुक्मिणी मातेची महापूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थितीत अत्यंत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडली.
दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरीत वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी लावल्यामुळे अवघी पंढरी वारकऱ्यांविना सुनीसुनी राहिली. माघ वारीनिमित्त पहाटे मंदिर समितीच्यावतीने ही महापूजा पार पडली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यानिमित्त मंदिर आणि मंदिराच्या गाभाऱ्यात विविध आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. सुमारे एक टन फुलांची सजावट या आरासासाठी करण्यात आली. त्याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
अत्यंत मोजक्याच भाविकांची उपस्थिती या महापुजेला होती. तर दुसरीकडे एरव्ही वारी कालावधीत चंद्रभागा नदी आणि नगरप्रदक्षिणा मार्गावर ओसंडून वाहणारी गर्दी यंदा मात्र पूर्णपणे लोपल्याचे चित्र होते. मंगळवार पहाटे ते उद्या बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत शहर आणि परिसरातील दहा गावात संचारबंदी लावण्यात आल्याने अवघी पंढरी सुनीसुनी दिसत होती.
- 1 of 1064
- ››