रेशीम उद्योगाच्या यशस्वितेसाठी महारेशीम अभियान

मराठवाड्यासह राज्यात येत्या २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. नाव नोंदणी, नर्सरी व प्रशिक्षण या तिन्ही टप्प्यांतून गेलेला शेतकरी यशस्वी झाल्याचा रेशीम विभागाचा अनुभव आहे.
Maharashim Abhiyan for the success of the silk industry
Maharashim Abhiyan for the success of the silk industry

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यात येत्या २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. नाव नोंदणी, नर्सरी व प्रशिक्षण या तिन्ही टप्प्यांतून गेलेला शेतकरी यशस्वी झाल्याचा रेशीम विभागाचा अनुभव आहे. त्याला जोडून मनरेगामधून आता रेशीम उद्योगासाठी समृद्धी‌ बजेट सादर करण्याची संधी मिळावी, या उदेशाने डिसेंबरला सुरू होणारे महारेशीम अभियान नोव्हेंबरपासूनच राबविण्याचा निर्णय रेशीम संचालनालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पट करणे, लागवडीपूर्वी प्रशिक्षण देणे, वेळेत शेतकऱ्यांची नोंदणी करणे, वेळेत नर्सरी तयार करण्यासाठीची पूर्वतयारी करणे, वेळेत मनरेगाच्या प्रस्तावास ग्रामसभेचा ठराव घेणे, लेबर बजेट मंजूर करून घेणे, प्रस्तावास तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी, कार्यारंभ आदेश वेळेत प्राप्त करून घेणे, पोकरासारख्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करून अंमलबजावणी करणे, रेशीम उद्योगासंबंधीच्या इतर योजनांचा प्रसार करणे आदी उदेश डोळ्यासमोर ठेवून यंदा महारेशीम अभियान २५ नोव्हेंबरपासून राबविले जाणार आहे. 

...असे असेल अभियान महारेशीम अभियानाच्या अंमलबजावणीची रूपरेशा ठरविण्यासाठी ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रेशीम विभागाचे उपसंचालक दिलीप हाके यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठकही घेण्यात आली. यामध्ये महारेशीम अभियान कार्यप्रणाली, उदिष्ट, अभियानात यंत्रणांचा सहभाग, अभियान राबविण्यासाठी लागणारे साहित्य, नोंदणी अर्ज कागदपत्र सूची, माहिती पुस्तक, पत्रिका, आदी महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली होती. महारेशीम अभियानाच्या यशस्वितेमुळे महाराष्ट्राच्या रेशीम संचालनालयाचा याआधीच राष्‍‌ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन गौरव झाला आहे. नाव नोंदणी, फेब्रुवारीपूर्वी नर्सरी तयार झाल्यास प्रशिक्षण घेऊन जून-जुलैमध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योगाला सुरुवात केल्यास खात्रीशीर यश या उद्योगात मिळते हे सिद्ध झाले आहे. यंदा मराठवाड्याला २०७५ एकर, पश्‍चिम महाराष्‍‌ट्रासाठी १६०० एकर, अमरावती विभागासाठी ९०० एकर, तर नागपूर विभागासाठी ३५० एकर तुती लागवडीचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला १०० एकर तुती  लागवड लक्ष्यांक, १००० शेतकरी भेटीचा लक्ष्यांक, तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ गावांचा लक्ष्यांक पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या यशस्वितेसाठी नियोजनपूर्वक महारेशीम अभियान राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन उत्पन्नसाठी रेशीम उद्योगाकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. उत्पन्न दुप्पट करण्याच्या शासनाच्या उद्देशाला रेशीम उद्योग पूरक आहे. -दिलीप हाके, उपसंचालक, रेशीम विभाग

जिल्हानिहाय तुती लागवड लक्ष्यांक (एकरांमध्ये) जिल्हानिहाय तुती लागवड लक्ष्यांक (एकरांमध्ये)  औरंगाबाद ...३००  जालना ... ३००  परभणी... २२५  हिंगोली... २५०  नांदेड... २००  लातूर ...२००  उस्मानाबाद...३००  बीड... ३००  पुणे... ३००  सातारा...२००  सोलापूर... ३००  कोल्हापूर...१५०  अहमदनगर ...२५०  नाशिक/जळगाव...२००  जव्हार/पालघर...५०  अमरावती...२००  यवतमाळ...२००  वाशीम...१००  बुलडाणा...२००  अकोला...२००  वर्धा... २००  नागपूर..१५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com