agriculture news in Marathi, , Maharashtra | Agrowon

उर्वरित विमा रक्‍कम द्या देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

जामखेड, जि. जालना  : विमासंरक्षित रकमेनुसार शेतकऱ्याची बाकी असलेली रक्‍कम येत्या ३० दिवसांच्या आत शेतकऱ्याला देण्याचा निर्णय जालना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिल्याची माहिती याप्रकरणी शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ॲड. आर. यू. तार्डे यांनी दिली. 

जामखेड, जि. जालना  : विमासंरक्षित रकमेनुसार शेतकऱ्याची बाकी असलेली रक्‍कम येत्या ३० दिवसांच्या आत शेतकऱ्याला देण्याचा निर्णय जालना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिल्याची माहिती याप्रकरणी शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ॲड. आर. यू. तार्डे यांनी दिली. 

निर्धारित विमासंरक्षित रकमेच्या तुलनेत जालना जिल्ह्यासाठी नियुक्‍त टाटा एआयजी इन्शुरंस कंपनीने कमी विमा परतावा दिल्याची तक्रार अंबड तालुक्‍यातील भवानीसिंग चौहान, गणेश तुकाराम जाधव, रेखा ज्ञानेश्वर जाधव, नय्यूम शेख, कमलाबाई धुळे यांनी ३ मे २०१९ ला जालना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल केली होती. यासंदर्भात भवानीसिंग चौहान यांच्या तक्रारीनुसार त्यांनी १ हेक्‍टर ६० आर मोसंबीचे क्षेत्र २०१८-१९ च्या मृग बहाराकरिता संरक्षित केले होते.

गट क्रमांक १६४५ मधील या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांनी भरावयाची ६१६० रुपयांची रक्‍कम भरल्यानंतर त्यांची विमासंरक्षित रक्‍कम १ लाख २३ हजार २०० रुपये झाली होती. त्यासाठी निर्धारित अटीनुसार पावसाचा खंड व पडलेला अत्यल्प पाऊस पाहता, त्यांना शंभर टक्‍के विमासंरक्षित रक्‍कम मिळणे अपेक्षित होते; परंतु विमा कंपनीने त्यांना १ लाख ८ हजार २०० रुपयांचा विमा परतावा दिला होता. 

याप्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा नीलिमा संत, सदस्या नीता कांकरिया, एम. एम. चितलांगे यांनी अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करत टाटा एआयजी जनरल इन्शुरंस कंपनी लिमिटेड यांना ३० दिवसांच्या आत अर्जदार भवानीसिंग चौहान यांना १४ हजार ८८० रुपये उर्वरित विमा रक्‍कम अदा करण्याचे आदेश ११ ऑक्‍टोबरला दिले. याचप्रकारे गणेश जाधव, रेखा जाधव, कमलबाई धुळे व नय्यूम शेख यांच्या तक्रारीप्रकरणी उर्वरित रक्‍कम देण्याचे आदेश दिल्याची माहिती ॲड. तार्डे यांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...