agriculture news in marathi, Maharashtra Agriculture minister Pandurang Fundkar passed away | Agrowon

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय ६७) यांचे आज (गुरुवारी) पहाटे हृदयविकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय, कृषी आणि ग्रामिण विभागातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय ६७) यांचे आज (गुरुवारी) पहाटे हृदयविकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय, कृषी आणि ग्रामिण विभागातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन तपासणी केली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण, सोमय्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली.

बुलडाणा, खामगाव परिसरात भाजपला वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकऱ्यांशी भाजपला जोडण्याचे काम फुंडकर करत होते. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने होत असताना फुंडकर यांनी योग्य पद्धतीने ती हाताळली. सामान्या नागरिकांशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती. पांडुरंग फुंडकर हे तीन वेळा अकोला मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.

फुंडकर यांचे प्रार्थिव आज (ता.३१) दुपारी ३.४५  अकोला विमानतळ येथे आणण्यात येणार आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता खामगाव येथे सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालय येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • खामगांव ते आमगांव ही यात्रा काढून शेतकरी प्रश्नाना फोड़ली होती वाचा
  • बुलडाणा जिल्ह्यात नांदूरा तालुक्यातील एका खेडयात झाला होता जन्म
  • तिन वेळा अकोल्याचे खासदार
  • सातत्याने विधान परिषदेत प्रतिनिधित्व, विरोधी पक्षनेते
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष पदही सांभाळले
  • खडसे यांच्या राजीनाम्या नंतर मिळाले होते कृषिमंत्रीपद

अतिशय वाईट आणि धक्कादायक बातमी!‬
‪आमचे ज्येष्ठ नेते, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे आज निधन झाले. ‪त्यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे.* शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे.‬ ‪विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
- मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस

भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते म्हणून फुंडकर यांची ओळख होती. भाजपच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होती.
- रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष 

माझा त्यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसला नाही. भाजपला महाराष्ट्रात उभारी देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची नीट जाण त्यांना होती. 
- चंद्रकांत पाटील, भाजप नेते

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...