agriculture news in marathi Maharashtra ahed of Country in Sugar Production | Agrowon

देशात साखर उत्पादनात राज्याची आघाडी कायम

राजकुमार चौगुले
रविवार, 20 डिसेंबर 2020

देशात गळीत हंगामाने गती पकडली आहे. पहिल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत साखर उत्पादनात महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम ठेवली आहे. १५ डिसेंम्बर अखेर महाराष्ट्रात २६.९६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर : देशात गळीत हंगामाने गती पकडली आहे. पहिल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत साखर उत्पादनात महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम ठेवली आहे. १५ डिसेंम्बर अखेर महाराष्ट्रात २६.९६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील १७३ कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. 

महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेशात २२.६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात १५ डिसेंम्बर अखेर ७३.७७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीचा याच कालावधीचा विचार करता हे उत्पादन २९ लाख टनांनी जास्त आहे. गेल्या वर्षी या कालावधी पर्यंत ४५ लाख टन साखर तयार झाली होती.

दोन महिन्यांत साखर उत्पादनाचा वेग आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने साखर उत्पादन होत आहे. 

गेल्या अडीच महिन्यांतील हंगामाचा विचार केल्यास यंदा देशातील कारखाने वेळेत सुरू झाले. देशात आतापर्यंत ४६० साखर कारखाने सुरू झाले आहेत.  यंदा सुमारे १२५ साखर कारखाने जादा ऊसगाळप करत असल्याने याचा परिणाम साखर उत्पादन वाढीवर झाला आहे. 

गेल्या महिन्यापासून देशातील ऊस पट्ट्यामध्ये पावसाने ब्रेक घेतला आहे. विशेष करून महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये कोरडे हवामान असल्याने याचा फायदा वाफसा येण्यावर झाला आहे. या राज्यात मजुरांची संख्या कमी असली तरी यंत्राच्या साह्याने यंदाचा हंगाम पूर्ण करण्यासाठी कारखाने प्रयत्नशील असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यनिहाय गाळप हंगाम स्थिती (स्रोत- इस्मा)
(१५ डिसेंबरअखेर) (उत्पादन लाख टनांत)

  • राज्य   आणि उत्पादन 
  • उत्तर प्रदेश :   २२.६०  
  • महाराष्ट्र  :  २६.९६ 
  • कर्नाटक  :  १६.६६ 
  • गुजरात  :  २.४०

इथेनॉलनिर्मितीत वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. महाराष्ट्रात ६० साखर कारखान्यांनी ‘बी-हेवी’ मोलॅसिस आणि ऊस रसापासून थेट इथेनॉलनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी केवळ ३० कारखान्यांनी इथेनॉलनिर्मिती सुरू केली होती. उत्तर प्रदेशातही २८ कारखान्यांनी इथेनॉलनिर्मिती सुरू केली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात २० कारखान्यांनी इथेनॉलनिर्मिती केली होती. कर्नाटकात ३० कारखाने इथेनॉलनिर्मितीत अग्रेसर आहेत.

दरातील घसरणीमुळे चिंता
अडीच महिन्यांत उच्चांकी साखर उत्पादन होत असले, तरी साखर दराबाबत फारशी समाधानकारक स्थिती नाही. उत्तरेकडील राज्यामध्ये गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर स्थिर आहेत. पण दक्षिणेकडील महाराष्ट्र, कर्नाटक राज्यामध्ये मात्र साखर दराची चिंता कायम आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत देशांतर्गत बाजारात साखरेची किमतीत क्विंटलला ५० ते १०० रुपयांची घट आहे याची चिंता साखर उद्योगाला आहे.

प्रतिक्रिया...
यंदा साखर उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाले. साखरनिर्यात अनुदानाबाबत केंद्राने निर्णय घेतला असला, तरी एमएसपी वाढीबाबतही तातडीने निर्णय अपेक्षित आहे.  
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...