महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला निकाल

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला निकाल
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला निकाल

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य विधानसभा निवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयोगाने आज (ता.२१) येथे केली. महाराष्ट्रात  २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. एकाच टप्पात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात २८८ जागांकरिता ८.९४ कोटी मतदार यावेळी आपला हक्क बजावणार आहेत. याकरिता १.८ लाख ईव्हीएम मशिन्सचा वापर होणार आहे. आजपासून आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. हरियाणात ९० जागांकरिता निवडणूक होत आहे.  अशी पार पडणार निवडणूक प्रक्रिया...

२७ सप्टेंबर - नोटिफिकेशन ४ ऑक्टोबर -  अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ ऑक्टोबर - अर्ज छाननी ७ ऑक्टोबर - अर्ज माघारी मुदत २१ ऑक्टोबर - मतदान २४ ऑक्टोबर - मतमोजणी

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल तेराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेला ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. २०१४ ची ही निवडणूक १५ ऑक्टोबर २०१४ रोजी राज्यात एकाच फेरीत घेतली गेली. याद्वारे महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले.  २०१४ लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आपली आघाडी मोडत निवडणूक वेगळ्याने लढवण्याचे ठरवले. तसेच जागावाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची २५ वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली. त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com