agriculture news in marathi Maharashtra to cross ten thousand corona patient number | Agrowon

राज्यातील रुग्णांची संख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

राज्यात बुधवारी कोरोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या ९ हजार ९१५ एवढी झाली आहे. आणखी २०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत एकूण १ हजार ५९३ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात बुधवारी कोरोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या ९ हजार ९१५ एवढी झाली आहे. आणखी २०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत एकूण १ हजार ५९३ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

राज्यात बुधवारी ३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मुंबईत २६, पुणे शहरात तीन; तर सोलापूर शहर, औरंगाबाद शहर आणि पनवेल शहरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २५ पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी १७ रुग्ण ६० वर्षे किंवा त्यावरील आणि १५ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील होते. एकूण १८ (५६ टक्के) रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोरोनाच्या विषाणूने राज्यात घेतलेल्या बळींची संख्या आता ४३२ झाली आहे.

केंद्रीय पथक पुणे विभागात
डॉ. ए. के. गडपायले यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय केंद्रीय पथक सध्या पुणे विभागाच्या भेटीवर आहे. हे केंद्रीय पथक क्षेत्रीय पातळीवर भेटी देऊन कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक कामाची पाहणी करत आहे. केंद्रीय पथक आणि स्थानिक
अधिकाऱ्यांनी बुधवारी सोलापूर कंटेन्मेंट झोनमधील कामाची पाहणी केली व क्षेत्रीय पातळीवरील कृतियोजनेचा आढावा घेतला. 
 


इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...