राज्यातील धरणे भरली !

सप्टेंबरमध्ये झालेल्या धो धो पावसामुळे राज्यातील तीन हजार २६७ धरणांत तब्बल १२२८ टीएमसी (३४८०६.३२ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच सरासरी ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
राज्यातील धरणे भरली !
राज्यातील धरणे भरली !

पुणे : चालू वर्षी ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणी टंचाईचे संकेत देण्यात आले होते. मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या धो धो पावसामुळे राज्यातील तीन हजार २६७ धरणांत तब्बल १२२८ टीएमसी (३४८०६.३२ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच सरासरी ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये उजनी, जायकवाडी, कोयना असे मोठे असलेले प्रकल्प शंभर टक्के भरल्याने आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट टळले आहे.    मोठ्या प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १४१ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला कमी पाऊस झाला होता. त्यामुळे धरणात फारशी नवीन पाण्याची आवक झालेली नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नव्हती. परंतु गेल्या काही दिवस चांगला पाऊस झाल्याने सध्या मोठ्या प्रकल्पात ९७१ टीएमसी म्हणजेच सरासरी ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात तब्बल ९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत चालू वर्षी एक टक्क्याने वाढ झाली आहे. यंदा अमरावती विभागातील धरणात ८२.०४ टीएमसी म्हणजेच ९८ टक्के, औरंगाबाद विभागातील धरणांत १५४.११ टीएमसी म्हणजेच ९६ टक्के, पुणे विभागातील धरणांत ४१८ टीएमसी म्हणजेच ९५ टक्के, कोकणातील धरणांत ८५.८३ टीएमसी म्हणजेच ९८ टक्के, नागपूर विभागातील धरणांत १०४.१५ टीएमसी म्हणजेच ८५ टक्के, नाशिक विभागातील धरणांत १२७.४७ टीएमसी म्हणजेच ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विभागनिहाय धरणातील पाणीसाठा  (टीमसीमध्ये)

विभाग संख्या पाणीसाठा टक्के
अमरावती ४४६ १२३.१७ ८५.६३
औरंगाबाद ९६४ ११२.७३ ११२.७३
कोकण १७६ ११७.६१ ९४.९१
नागपूर ३८४ १२८.९८ ७९.३
नाशिक ५७१ १७७.०९ ८३.५५
पुणे ७२६ ४६९.२० ८७.३७

कोकणातील धरणांत मुबलक पाणीसाठा : यंदा कोकणात सुरवातीपासून चांगला पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सप्टेंबर महिन्यातही कोकणातील बहुतांश भागात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. त्यामुळे नद्या, ओढे भरून वाहत होते. धरणात नवीन पाण्याची आवक होऊन चांगलाच पाणीसाठा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, घाटमाथ्यावरही पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या होत्या. कोकणातील लहान मोठ्या असलेल्या एकूण १७६ प्रकल्पात ११७.६१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सरासरी ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. जून, जुलै महिन्यांत पावसाने बऱ्यापैकी धुमाकूळ घातल्यानंतर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र ऑगस्टमध्ये पडलेल्या खंडामुळे धरणातील पाणीपातळीत फारशी वाढ झाली नव्हती. राज्यात ७ सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यातील धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के घट झाली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहिले. सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात सरासरी १००४.२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने ११९४.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये कोकणात ३५५९.८ मिलिमीटर म्हणजेच २४ टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात ८७२.६ मिलिमीटर म्हणजेच १६ टक्के अधिक, मराठवाड्यात ९८८.५ मिलिमीटर म्हणजेच ४८ टक्के अधिक, तर विदर्भात ९६८.९ मिलिमीटर म्हणजेच ३ टक्के अधिक पाऊस झाल्याची नोंद झाल्याने धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली.

पुणे विभागात ८७ टक्के पाणीसाठा : यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत पुणे विभागातील अनेक भागांत फारसा पाऊस झालेला नव्हता. घाटमाथ्यावर पावसाचा जोर असल्याने धरणे भरण्याच्या मार्गावर होती. परंतु सप्टेंबरमध्ये घाटमाथ्यासह पूर्व भागात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर भागांत असलेली वरसगाव, पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, भाटघर, नीरा देवघर, वारणा, धोम, तुळशी अशी सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. मोठ्या धरणात समावेश असलेल्या कोयना धरण ऑगस्टमध्ये भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. या भागातील ७२६ धरणांत ४६९.२० टीएमसी म्हणजेच सरासरी ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुणे शहरासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com