agriculture news in marathi maharashtra faces 149 deaths uptill now after corona outbreak in state | Agrowon

राज्यातील मृतांची संख्या १४९ वर; १६१६ रुग्णांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 एप्रिल 2020

राज्यात गेल्या चोवीस तासात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २ आणि सोलापूरचा १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता १४९ झाली आहे.

मुंबई : राज्यात गेल्या चोवीस तासात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २ आणि सोलापूरचा १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता १४९ झाली आहे. तसेच २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या १९८२ झाली आहे. तसेच राज्यभरात २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता.१२) दिली.

४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे नमुने निगेटिव्ह आले तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिकास्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलडाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि नगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण नगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत. 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

 1. मुंबई महानगरपालिका १२९८ (मृत्यू ९२)
 2. ठाणे ०६
 3. ठाणे मनपा ४४ (मृत्यू ०३)
 4. नवी मुंबई मनपा ४५ (मृत्यू ०३)
 5. कल्याण डोंबवली मनपा ४६ (मृत्यू ०२)
 6. उल्हासनगर मनपा ०१
 7. भिवंडी निजामपूर मनपा ०१
 8. मीरा भाईंदर मनपा ४२ (मृत्यू ०१)
 9. पालघर ०४ (मृत्यू ०१)
 10. वसई विरार मनपा २१ (मृत्यू ०३)
 11. रायगड ०४
 12. पनवेल मनपा ०८ (मृत्यू ०१)
 13. *ठाणे मंडळ एकूण* *१५२०(मृत्यू १०६)*
 14. नाशिक ०२
 15. नाशिक मनपा ०१
 16. मालेगाव मनपा १५ (मृत्यू ०२)
 17. अहमदनगर १०
 18. अहमदनगर मनपा १६
 19. धुळे ०१ (मृत्यू ०१)
 20. धुळे मनपा ००
 21. जळगाव ०१
 22. जळगाव मनपा ०१ (मृत्यू ०१)
 23. नंदूरबार ००
 24. *नाशिक मंडळ एकूण* *४७ (मृत्यू ०४)*
 25. पुणे ०७
 26. पुणे मनपा २३३ (मृत्यू ३०)
 27. पिंपरी चिंचवड मनपा २३
 28. सोलापूर ००
 29. सोलापूर मनपा ०१ (मृत्यु ०१)
 30. सातारा ०६ (मृत्यू ०२)
 31. *पुणे मंडळ एकूण* *२७० (मृत्यू ३३)*
 32. कोल्हापूर ०१
 33. कोल्हापूर मनपा ०५
 34. सांगली २६
 35. सांगली मि., कु., मनपा ००
 36. सिंधुदुर्ग ०१
 37. रत्नागिरी ०५ (मृत्यू ०१)
 38. *कोल्हापूर मंडळ एकूण* *३८(मृत्यू ०१)*
 39. औरंगाबाद ०३
 40. औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू ०१)
 41. जालना ०१
 42. हिंगोली ०१
 43. परभणी ००
 44. परभणी मनपा ००
 45. *औरंगाबाद मंडळ एकूण* *२१ (मृत्यू ०१)*
 46. लातूर ००
 47. लातूर मनपा ०८
 48. उस्मानाबाद ०४
 49. बीड ०१
 50. नांदेड ००
 51. नांदेड मनपा ००
 52. *लातूर मंडळ एकूण* *१३*
 53. अकोला ००
 54. अकोला मनपा १२
 55. अमरावती ००
 56. अमरावती मनपा ०५ (मृत्यू ०१)
 57. यवतमाळ ०४
 58. बुलढाणा १३ (मृत्यू ०१)
 59. वाशिम ०१
 60. *अकोला मंडळ एकूण* *३५ (मृत्यू ०२)*
 61. नागपूर ०१
 62. नागपूर मनपा २७ (मृत्यू ०१)
 63. वर्धा ००
 64. भंडारा ००
 65. गोंदिया ०१
 66. चंद्रपूर ००
 67. चंद्रपूर मनपा ००
 68. गडचिरोली ००
 69. *नागपूर मंडळ एकूण* *२९(मृत्यू ०१)*
 70. इतर राज्ये ०९ (मृत्यू ०१)
  *एकूण* *१९८२ (मृत्यू १४९)*

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४८४६ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १७.४६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील २६ जण करोना बाधित आढळले होते. यातील २४ जणांना आता पर्यंत घरी सोडण्यात आले आहे. इस्लामपूरातील या भागात ३१ सर्वेक्षण पथकांनी मागील २ आठवडे साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...