साखरनिर्मितीत महाराष्ट्र, कर्नाटकची आघाडी

देशात यंदाचा गळीत हंगाम हळूहळू गती पकडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ नोव्हेंबरअखेर सुमारे ४ लाख टन साखर जादा तयार झाली आहे. यंदा या कालावधीत २० लाख टन साखर देशात तयार झाली आहे.
Maharashtra, Karnataka lead in sugar production
Maharashtra, Karnataka lead in sugar production

कोल्हापूर : देशात यंदाचा गळीत हंगाम हळूहळू गती पकडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ नोव्हेंबरअखेर सुमारे ४ लाख टन साखर जादा तयार झाली आहे. यंदा या कालावधीत २० लाख टन साखर देशात तयार झाली आहे. महाराष्ट्र गाळपात आघाडीवर असून, २०पैकी एकट्या महाराष्ट्रात ९ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी देशात याच कालावधीत २८९ साखर कारखाने उसाचे गाळप करत होते. यंदा त्यात वाढ होऊन ही संख्या ३०८ वर पोहचली आहे. दक्षिण आणि पश्चिमेकडील अनेक साखर कारखान्यांनी या हंगामाच्या सुरुवातीला गतीने गाळप केले आहे. त्यामुळे या वर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत साखरेचे उत्पादन थोडे वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.  उत्तर प्रदेशात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे याचा परिणाम ऊस तोडणीवर झाला. उत्तर प्रदेशातील ऊसतोडणी संथ गतीने सुरू असल्याने साखर निर्मिती घटली आहे. उत्तर प्रदेशात केवळ २.८८ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत उत्तर प्रदेशात ४ लाख टनांहून अधिक साखर तयार झाली होती.  उत्तर प्रदेशमध्ये सध्या ७४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गेल्या हंगामात या कालावधीत ७६ कारखाने सुरू होते. यातून ४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्रात १३४ साखर कारखान्यांनी ८.९१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे, त्या तुलनेत मागील हंगामात १२० कारखान्यांनी याच तारखेअखेर ६ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.  गेल्या वर्षी विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात हंगामाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोडीची गती संथ होती. यंदा मात्र सुरुवातीलाच साखर कारखान्यांनी वेग घेतला आहे. उत्तराखंड, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या उर्वरित राज्यांमध्ये, सुमारे २३ कारखान्यांनी  गाळप सुरू केले. आतापर्यंत ७४,००० टन साखरेचे उत्पादन केले आहे. यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशापेक्षा महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांनी साखर निर्मितीत आघाडी घेतली आहे. कर्नाटकात नोव्हेंबर मध्यापर्यंत ७.६२ लाख टन साखर तयार झाली आहे.  २५ लाख टन साखर निर्यातीचे करार बंदरातील माहिती आणि बाजार अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे २५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. यापैकी, गेल्या वर्षीच्या याच महिन्यात निर्यात केलेल्या १.९६ लाख टन साखरेच्या तुलनेत ऑक्टोबर २१मध्ये सुमारे २.७ लाख टन साखर निर्यात झाली आहे. नोव्हेंबरमध्ये  आणखी २ लाख टन साखर निर्यात केली जाईल, अशी शक्यता ‘इस्समा’ने वर्तवली आहे. यंदाच्या गळीत हंगामावर दृष्टिक्षेप      महाराष्ट्रात ९ लाख टन साखर तयार     कर्नाटकात नोव्हेंबर मध्यापर्यंत ७.६२ लाख टन साखर तयार     उत्तर प्रदेशात केवळ २.८८ लाख टन साखर तयार     उत्तर प्रदेशमध्ये ७४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू     महाराष्ट्रात १३४ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू      उत्तराखंड, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधील २३ कारखान्यांकडून गाळप

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com