agriculture news in marathi Maharashtra permits 25 flights departures, 25 landings | Agrowon

मुंबईतून आजपासून ५० विमानांची ये-जा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

देशभरातून दररोज १०५० विमानांचे उड्डाण होणार आहे. त्यापैकी २५ विमाने मुंबईतून झेप घेतील व तेवढ्याच विमानांना उतरण्याची परवानी देण्यात आली आहे.

मुंबई : देशांतर्गत विमान उड्डाणे उद्यापासून सुरू होणार आहेत. देशभरातून दररोज १०५० विमानांचे उड्डाण होणार आहे. त्यापैकी २५ विमाने मुंबईतून झेप घेतील व तेवढ्याच विमानांना उतरण्याची परवानी देण्यात आली आहे.

केंद्रिय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवार (ता.२५) पासून देशांतर्गत विमानसेवा मर्यादित प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूने विरोध दर्शविला होता. पहिल्यांदा तमिळनाडूने विमान उड्डाणांची तयारी दर्शविली, त्यानंतर आता महाराष्ट्राने तयारी दर्शविली आहे. पश्चिम बंगालने मात्र थोडी मुदत मागितली आहे. देशभरातील १३ राज्यांनी यासाठीची स्वतंत्र नियमावली केली असून, त्यानुसार विमानांतून येणाऱ्या प्रवाश्‍यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे.

मुंबई विमानतळावरून दैनंदिन २५ विमानांच्या उड्डाणांना आणि २५ विमाने उतरण्यास परवानगी दिल्याची माहिती कौशल्य व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबई विमानतळावरून दैनंदिन सुमारे ९५० विमाने उडण्याची क्षमता आहे. त्याप्रमाणे जास्तीत जास्त विमाने उडवण्याचा केंद्राचा प्रयत्न होता. त्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी देशातील सर्व विमानतऴ प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबईतील कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि प्रवासी वाहतुकीचे आव्हान लक्षात घेता या विमानसेवेवर आक्षेप घेतला होता.

राज्याची नियमावली लवकरच
सुरूवातीच्या टप्प्यात मर्यादित स्वरूपात प्रवासी विमानांचे उड्डाण होणार आहे. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ केली जाणार असून, लवकरच राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात येणार आहे, असे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

 


इतर बातम्या
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...