केंद्राकडून महाराष्ट्राला २८ हजार कोटी; राज्यात खोटा प्रचार

केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, केंद्राने सर्व राज्यांना मदत केली आहे. महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून एकूण २८ हजार १०४ कोटी रुपये मिळाले आहे.
devendra Fadnavis
devendra Fadnavis

मुंबई: केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, केंद्राने सर्व राज्यांना मदत केली आहे. महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून एकूण २८ हजार १०४ कोटी रुपये मिळाले आहे. मात्र, राज्यात खोटा प्रचार केला जात असून अन्यायाचे वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२६) केला आहे.  राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दिग्गज नेत्यांच्या फेऱ्या वाढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली त्याची आकडेवारीनुसार माहिती देत संपूर्ण लेखाजोखा मांडला.  ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून एकूण २८ हजार १०४ कोटी रुपये मिळाले आहे. “केंद्र सरकारने राज्य सरकारला शेतमाल खरेदीसाठी देखील मदत केली आहे. कापसाच्या खरेदसाठी राज्याला ५६४७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तांदूळ खरेदी करता २ हजार ३११ कोटी दिले आहेत. तूर खरेदीकरता ५९३ कोटी, चणा-मका खरेदी करता १२५ कोटी रुपये दिले आहेत. याव्यतिरिक्त पीक विम्याचे ४०३ कोटी रुपये दिले आहेत. पैसे नाहीत म्हणून शेतकरी, बारा बलुतेदार यांना मदत करणार नाही, अशी ओरड करता येणार नाही, कर्नाटक, गुजरात आणि काँग्रेसशासित छत्तीसगडनेही ही मदत केली आहे.  “महाराष्ट्राला केंद्राकडून एकूण २ लाख ७० हजार कोटी मिळत आहेत, इतर राज्य घेत आहेत, मग महाराष्ट्र का नाही?” असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला.  फडणवीस म्हणाले...

  • राज्याला १० लाख पीपीई किट्स, १६ लाख N ९५ मास्क दिले 
  • वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी ४४८ कोटी रुपये दिले 
  • ‘इव्होल्यूशन ऑफ टॅक्सेस’च्या अंतर्गत ५६४८ कोटी रुपये दिले 
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना ३५ हजार कोटी रुपये कर्ज घेता येईल 
  • ‘पीएम-किसान’मधून १७२६ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले 
  • जनधन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १३०८ कोटी जमा केले 
  • राज्याला ४५९२ कोटी रुपयांच अन्नधान्य दिल 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com