‘नाफेड'ची कांदा खरेदी १० लाख टनांपर्यंत वाढवा : राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

सध्या कांद्याला ९ रुपयांपर्यंत भावाने नाफेड कांदा खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने या संकटातून बाहेर काढण्यासाठी नाफेडने केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त निधीतून १० लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करून २० रुपये प्रतिकिलो या भावाने खरेदी करावा. तरच, कांदा उत्पादक उभा राहू शकणार आहे. - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
Maharashtra State Onion Growers' Association demands to increase NAFED's onion procurement to 10 lakh tonnes
Maharashtra State Onion Growers' Association demands to increase NAFED's onion procurement to 10 lakh tonnes

नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भाव वाढत असल्याने तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या खरेदी व विक्रीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत नाफेडने कांदा खरेदी १० लाख टनांपर्यंत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली.  

कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्यातील मोजक्या बाजार समित्या सोडल्या, तर उर्वरित बाजार समित्या मागील दोन महिन्यांपासून सातत्याने बंद आहेत. त्यामुळे नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अकोला, परभणी, धुळे, जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा कांदा हवा तितका विक्री करता आला नाही. लासलगाव सुद्धा कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. येथील बाजार बंद झाला आहे. 

मार्च महिन्याच्या अखेरीस व एप्रिल महिन्याच्या मध्यात राज्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे कांदा भिजला. त्यामुळे नुकसान झाले आहे. त्यात पुरवठा करण्यात अडचणी असल्याने बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या माध्यमातून नाफेडने सुरू केलेली कांदा खरेदी अवघी ५० हजार टन इतकीच आहे. त्यामुळे त्याचा विशेष फायदा होताना दिसत नाही. या परिस्थितीत केंद्राच्या माध्यमातून लक्ष्यांक वाढवून १० लाख टनांपर्यंत कांदा खरेदी करण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून होत आहे. 

गरज पडल्यास पर्यायी साठवणूक क्षमता वाढवा  

नाफेडच्या कांदा खरेदीत सर्वात मुख्य अडचण कांदा साठवणुक क्षमतेची अडचण सांगितली जाते आहे.यावर उपाय सध्या कोरोनामुळे विवाह समारंभ व इतर सर्व सार्वजनिक एकत्रित येण्याचे कार्यक्रम बंद असल्या कारणाने पुढील काही महिन्यांसाठी नाफेडने राज्यातील त्या त्या भागातील मंगल कार्यालये भाड्याने घेऊन कांदा खरेदी १० लाख मेट्रिक टन इतकी करावी व येथे हा कांदा साठवावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com