‘महाराष्ट्र शुगर्स’कडील रकमेसाठी ठिय्या

जिल्ह्यातील सायखेडा (ता. वसमत) येथील महाराष्ट्र शुगर्स साखर कारखान्याकडील शेअर्सची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
Maharashtra sugar dont paid sugarcane bill
Maharashtra sugar dont paid sugarcane bill

परभणी : जिल्ह्यातील सायखेडा (ता. वसमत) येथील महाराष्ट्र शुगर्स साखर कारखान्याकडील शेअर्सची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

महाराष्ट्र शुगर्स या साखर कारखान्याने परभणी जिल्ह्यातील, तसेच अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून प्रति सभासद २५ हजार रुपये शेअर्स घेतलेले आहेत. या कारखान्याकडे ऊस देयके थकीत आहेत. दरम्यानच्या काळात या कारखान्याची विक्री झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शुगर्स साखर कारखान्याकडील शेअर्सची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी सुकाणू समितीतर्फे डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु या मागणीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात न आल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कॉ. विलास बाबर, भारत वाघ, गोविंद पवार यांच्या नेतृत्वाखालील ठिय्या आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com