agriculture news in marathi maharashtra sugarcane labour gets grossery in tamilnadu | Agrowon

...अन् तामिळनाडूत महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांना अवघ्या तासात मदत मिळाली !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 एप्रिल 2020

नवी दिल्ली : पोटाची खळगी भरण्यासाठी थेट तामिळनाडूतल्या त्रिचीमध्ये जाऊन पोहोचलेल्या मराठवाड्यातील ऊसतोडणी मजुरांचे कोरोनाच्या संचारबंदीमुळे आणि भाषेच्या अडचणीमुळे चांगलेच हाल झाले होते. परंतु, तामिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकाऱ्यांच्या तत्परतेने या मजुरांना अवघ्या तासाभरात अन्नधान्याची मदत मिळाली. परभणीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची यात महत्त्वाची भूमिका राहिली.

नवी दिल्ली : पोटाची खळगी भरण्यासाठी थेट तामिळनाडूतल्या त्रिचीमध्ये जाऊन पोहोचलेल्या मराठवाड्यातील ऊसतोडणी मजुरांचे कोरोनाच्या संचारबंदीमुळे आणि भाषेच्या अडचणीमुळे चांगलेच हाल झाले होते. परंतु, तामिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकाऱ्यांच्या तत्परतेने या मजुरांना अवघ्या तासाभरात अन्नधान्याची मदत मिळाली. परभणीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची यात महत्त्वाची भूमिका राहिली.

ऊसतोडणी मजुरांच्या टोळीचे मुकादम अंकुश आडे ६० मजुरांना समवेत कोठारी साखर कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील लालगुडी तालुक्यात आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या मजुरांची अडचण सुरू झाली. कारखान्याकडून सुरवातचीचे पाचच दिवस मदत मिळाली. नंतर जवळचा शिधाही संपायला आला होता. त्यात भाषेची अडचण असल्याने अन्न कोठून मिळवावे हा प्रश्न होता. मुकादम आडेंनी परभणीत संपर्क साधला. हा विषय परभणीतील जिल्हा मदत केंद्रापर्यंत आणि परभणीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तामिळनाडूमध्ये अडकलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी हालचाल सुरू झाली.

ही मदत पोहोचविण्यात तामिळनाडू प्रशासनातील सनदी मराठी अधिकारी आनंद पाटील हे दुवा ठरले. आनंद पाटील यांनी ही माहिती तामिळनाडूतील आणखी एक मराठी प्रशासकीय अधिकारी अन्न व नागरी पुरवठा प्रशासनाचे आयुक्त असलेले सज्जन चव्हाण यांना दिली. आयुक्त चव्हाण यांनीही प्रशासकीय यंत्रणेचे चक्र वेगाने फिरवून लालगुडीच्या तहसीलदारांना या मजुरांपर्यंत धान्य पोहोचविण्याचे आदेश दिले. या आदेशापाठोपाठ लालगुडीच्या तहसीलदारांनी अवघ्या एका तासात स्वतः जाऊन या साठ मजुरांना १०० किलो तांदूळ, २५ किलो गहू आणि पाच किलो तूर डाळ असा धान्यसाठा दिला आणि या ऊसतोडणी मजुरांच्या पोटात अन्नाचा घास पडला.

महाराष्ट्रातील साखर कारखाने केवळ ४५ दिवस चालले. त्यामुळे राज्यात काम नसल्याने कामासाठी ऊस तोडणी मजूर तामिळनाडूपर्यंत पोहोचले. या साठ जणांव्यतिरिक्त बीड, परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील गंगाखेड, परळी, जिंतूर या आणखी २५० ते ३०० ऊस तोडणी मजूर (१३ ते १४ टोळ्या) तामिळनाडूमध्ये आहेत. याच भागात आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.

लालगुडी तालुक्यात अडकलेल्या गंगाखेडच्या ऊसतोडणी मजुरांची समस्या कळल्यानंतर मदतीसाठी तिरुचिरापल्ली जिल्हाप्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भाषेची अडचणीमुळे नेमकी माहिती समजावून सांगता येत नव्हती. तामिळनाडूतील सचिव आनंद पाटील यांच्या कानावर विषय घातल्यानंतर मदतकार्य वेगाने झाले.
— अरविंद लोखंडे, 
उपविभागीय अधिकारी, परभणी 

परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगून लालगुडीच्या तहसीलदारांना तेथे पाठवले. ज्याप्रमाणे तिरुचिरापल्लीत मराठवाड्यातील ऊसतोड मजूर आहेत, तसेच कोईम्बतूर जिल्ह्यातही बिहारी मजूर आहेत. त्यांनाही प्रशासनातर्फे मदत केली जात आहे. बाहेरील राज्यातील लोकांना भाषेची अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मदत केंद्रामध्ये हिंदी येणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जाणीवपूर्वक नेमणूक करण्यात आली आहे. 
— सज्जन चव्हाण, 
अन्न व नागरी पुरवठा आयुक्त


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...